Infinix Hot 11S स्मार्टफोन लवकरच होणार भारतात लॉन्च,जाणून घ्या फिचर्सबद्दल अधिक
Infinix (Photo Credits: Twitter)

स्मार्टफोन कंपनी इन्फिनिक्स भारतात आपले शानदार डिवाइस इन्फिनिक्स हॉट 11एक्स (Infinix Hot 11S) लॉन्च करण्याची तयारी करत आहे. याच दरम्यान, अपकमिंग स्मार्टफोन संबंधित एक रिपोर्ट समोर आला आहे. ज्यानुसार याची किंमत समोर आली आहे. या व्यतिरिक्त डिवाइसमध्ये दोन रॅम ऑप्शन सुद्धा मिळण्याची शक्यता आहे. त्याचसोबत रेडमी 10 प्राइम असणारा MediaTek Helio G88 प्रोसेसर मिळणार आहे.(YouTube ने हटवले 10 लाखांहून अधिक व्हिडिओ, जाणून घ्या त्यामागील कारण)

इन्फिनिक्सच्या मते, हॉट 11एस स्मार्टफोन सप्टेंबर महिन्याच्या मध्यापर्यंत लॉन्च केला जाऊ शकतो. कंपनीकडून आतापर्यंत किंमतीबद्दल कोणतीही माहिती देण्यात आलेली नाही. मात्र मीडिया रिपोर्ट्सनुसार, फोन 4जीबी रॅम+64जीबी स्टोरेज वेरियंटमध्ये येणार असून त्याची किंमत 9,999 रुपये आणि 6जीबी रॅम+64जीबी रॅम स्टोरेज वेरियंटची किंमत 10,999 रुपये असू शकते.

Infinix Hot 11S स्मार्टफोनमध्ये रेडमी 10 प्राइम असणारा MediaTek Helio G88 प्रोसेसर दिला जाऊ शकतो. त्याचसोबत यामध्ये एचडी डिस्प्ले, दमदार बॅटरी आणि ट्रिपर रियर कॅमेरा सेटअपचा सपोर्ट मिळू शकते. या व्यतिरिक्त फिचर संबंधिक अधिक माहिती समोर आलेली नाही.(Apple Watch च्या माध्यमातून तरुणाच्या हालचालींवर ठेवले लक्ष, संधी मिळताच पळवली 3 कोटी रुपयांची रोकड)

दरम्यान, कंपनीने या महिन्याच्या सुरुवातीला Infinix 5A झळकवला होता. यामध्ये 6.52 इंचाचा HD+IPS LCD डिस्प्ले दिला आहे. फोनमध्ये MediaTek Helio A20 प्रोसेसर दिला गेला आहे. त्याचसोबत ड्युअल रियर कॅमेरा सेटअप ही मिळणार आहे. यामध्ये 8MP चा प्रायमरी सेंसर आणि डेप्थ सेंसर उपलब्ध आहे. तर फोनमध्ये सेल्फीसाठी 8MP चा कॅमेरा मिळणार आहे.