Apple Smartwatch | (Photo Credits: apple.com)

अमेरिकेत एका चोरीच्या टोळीने अॅप्पल वॉचचा उपयोग करुन एका व्यक्तीकडून 500,000 डॉलर (जवळजवळ 3 कोटी रुपये) लूटल्याची घटना समोर आली आहे. ही घटना गेल्या वर्षी झाली होती. मात्र ही बातमी सर्वत्र आता पसरली गेली आहे. अॅप्पल वॉच नेहमीच एक स्वत:चे रक्षण करणाऱ्या उपकरणाप्रमाणे काम करते. याच्या माध्यमातून हार्ट रेट किंवा त्या संबंधित गोष्टींबद्दल आपल्याला सूचना देते. परंतु अॅप्पल वॉचच्या माध्यमातून करण्यात आलेली चोरी ही पहिलीच घटना असल्याचे बोलले जात आहे.

न्यूयॉर्क पोस्ट नुसार, जानेवारी 2020 मध्ये कनेक्टिकटच्या हार्टफोर्मध्ये सात लोकांच्या एका टोळीने चोरी केली होती. भामट्यांनी प्रथम पीडित व्यक्तीला पाहिले. त्यांचे असे म्हणणे होते की, पीडित व्यक्ती हा नशेच्या औषधांचा व्यवसाय करायचा. पीडितचा पाठलाग करण्यासाठी त्यांनी त्याच्याच कारच्या खाली एक अॅप्पल वॉच ठेवले. त्यानंतर भामट्यांनी त्याच्या हॉटेलच्या रुपचा पत्ता शोधला आणि पैसे घेऊन पळ काढण्यास ते यशस्वी झाले.(सावधान! तुमच्या फोनमधून आताच डिलिट करा हे धोकादायक Apps)

याआधी कारला ट्रॅक केल्यानंतर भामट्यांनी त्या व्यक्तीकडून पैशांनी भरलेली बॅग मिळेल अशी अपेक्षा केली. बंदूकीने त्याच्या कारच्या खिडक्या सुद्धा फोडल्या. मात्र त्यांना कारच्या आतमध्ये काहीच मिळाले नाही. वकिलांनी असे लिहिले की, ही सर्व माहिती सेल साइट लोकेशन द्वारे समर्थित आहे. ज्यामध्ये अॅप्पल वॉच आणि डिफेंडेंट फोनचा समावेश आहे.(Oneplus 9 RT: वनप्लस कंपनीचा आगामी OnePlus 9 RT स्मार्टफोन लवकरच बाजारात येण्याची शक्यता, पहा फोनची वैशिष्ट्ये)

यामध्ये पुढे असे सांगण्यात आले की, भामट्यांच्या प्रमुखाने प्रमथ एक अॅप्पल वॉच खरेदी केले. ते वॉट आपल्या AT&T अकाउंटला जोडले. अॅप्पल वॉच त्यानंतर पीडित व्यक्तीच्या कारच्या बंपर खाली ठेवण्यात आले. ही घटना 2020 मधील असून त्यावेळी अॅप्पल वॉच हे एकमात्र सोप्पे उपकरण होते की, त्याचा उपयोग लोकांना ट्रॅक करण्यासाठी केला जाऊ शकतो. अॅप्पल एअरटॅग्स जे विशेष रुपात वस्तू, लोकांना ट्रॅक करण्यासाठी डिझाइन करण्यात आले असून तेव्हा ते लॉन्च केले नव्हते.