सावधान! तुमच्या फोनमधून आताच डिलिट करा हे धोकादायक Apps
Smartphone apps (Photo Credits: Unsplash)

क्रिप्टोकरंन्सी (Cryptocurrency) माइनिंग विशेष रुपात गेल्या काही महिन्यांपासून सर्वांचे लक्ष वेधून घेत आहे. दरम्यान, हॅकर्स या पब्लिक इंटरेस्टचा वापर क्रिप्टोकरन्सी मध्ये करत आहे. जेणेकरुन निर्दोष लोकांना त्यांच्या स्मार्टफोनवर धोकादायक मैलवेअर आणि अॅडवेयर असणारे अॅप्स इंस्टॉल करण्यासाठी प्रेरित केले जाईल. या मैलवेयर आणि अॅडवेयर असणारे अॅप्सची ओळख पटली असून गुगलने आता ते हटवले आहेत. वास्तवात गुगल प्ले स्टोर मधून 8 धोकादायक अॅप्स हटवण्यात आले आहेत. जे क्रिप्टोकरंसी माइनिंग अॅप्सच्या रुपात तेथे उपलब्ध होते. या अॅप्सच्या द्वारे युजर्सला क्लाउड माइनिंग ऑपरेशन्समध्ये पैसे गुंतवणूक करुन मोठी रक्कम मिळवून देण्याचे आश्वासन देत होते.

सेफ्टी फर्म ट्रेंड मायक्रोच्या एका रिपोर्टनुसार हे धोकादायक 8 अॅप युजर्सला जाहीरात पाहण्यासाठी फसवत होते. ज्यामध्ये युजर्सकडून महिन्यात जवळजवळ 115 रुपये त्यांच्या माइनिंग क्षमता वाढवण्यासाठी केले जात होते. मात्र युजर्सला काहीच दिले जात नव्हते. कंपनीने आपल्या निष्कर्षाबद्दलची सुचना गुगल प्ले स्टोरला दिली. त्यानंतर गुगलकडून तातडीने धोकादायक अॅप्स हटवण्यात आले. मात्र जरी प्ले स्टोअरवरुन अॅप हटवले जरी असतील तरीही ते तुमच्या फोन मध्ये असल्यास ते आताच डिलिट करा.(Google चे पहिलेच इअरबड्स Pixel Buds A भारतात लॉन्च, जाणून घ्या किंमतीसह स्पेसिफिकेशन)

— BitFunds – Crypto Cloud Mining.

— Bitcoin Miner – Cloud Mining.

— Bitcoin (BTC) – Pool Mining Cloud Wallet.

— Crypto Holic – Bitcoin Cloud Mining.

— Daily Bitcoin Rewards – Cloud Based Mining System.

— Bitcoin 2021.

— MineBit Pro – Crypto Cloud Mining & btc miner.

— Ethereum (ETH) – Pool Mining क्लाउड.

रिचर्ज साइटचे असे म्हणणे आहे की, यामधील दोन अॅप हे पेड आहेत जे युजर्स पैसे देऊन वापरतात. युजर्सला Crypto Holic – Bitcoin Cloud माइनिंग अॅपसाठी जवळजवळ 966 रुपये द्यावे लागतात. तर Daily Bitcoin Rewards – Cloud Based Mining सिस्टम अॅपसाठी 445 रुपये द्यावे लागतात.

या व्यतिरिक्त ट्रेंड मायक्रोने असे म्हटले की, 120 हून अधिक खोट्या क्रिप्टोकरंन्सी माइनिंग अॅप सुद्धा ऑनलाईन उपलब्ध आहे. कंपनीने एका ब्लॉगमध्ये असे म्हटले की, हे अॅप ज्या मध्ये क्रिप्टोकरंन्सी माइनिंगची क्षमता नाही आहे. फक्त युजर्सला जाहीराती पाहण्यासाठी फसवतात. अशा अॅपच्या माध्यमातून जुलै 2020 ते जुलै 2021 पर्यंत जागतिक स्तरावर जवळजवळ 4500 हून अधिक युजर्सला प्रभावित केले आहे.