Google Doodle Today (PC - Google)

Paris Olympics 2024: शुक्रवारी पॅरिस ऑलिंपिक (Paris Olympics 2024) स्पर्धेला सुरुवात झाली आहे. गुगल (Google)ने शनिवारी पॅरिस ऑलिम्पिक 2024 दरम्यान प्लेस डी ला कॉन्कॉर्ड (Place De La Concorde) येथे आयोजित करण्यात येणारे स्केटबोर्डिंग इव्हेंट (Skateboarding Event) साजरे केले. गुगलने डूडलमध्ये घराच्या छतावर पक्ष्यांच्या स्केटबोर्डिंगचा समूह असलेले खास डूडल (Google Doodle) प्रसिद्ध केले.

Google डूडल आज पुरुषांसाठी स्केटबोर्डिंग इव्हेंट चिन्हांकित करते. यात दोन फेऱ्या आहेत. पुरूषांच्या स्ट्रीट प्रीलिमचे नियोजन दुपारचे आहे, त्यानंतर संध्याकाळी अंतिम फेरी होईल. स्केटबोर्डिंग, ब्रेकिंग, सर्फिंग आणि स्पोर्ट्स क्लाइंबिंगसह, ऑलिम्पिक कार्यक्रमात सादर केलेल्या चार नवीन खेळांपैकी एक आहे, जे 28 पारंपारिक ऑलिम्पिक खेळांमध्ये सामील झाले आहे. (हेही वाचा - Paris Olympic Games 2024 च्या उद्घाटन सोहळ्यात चक्क उलट्या दिशेने फडकवला गेला झेंडा; व्हिडिओ वायरल (Watch Video))

पॅरिस ऑलिम्पिक 2024 साठी 200 हून अधिक देशांतील खेळाडू, 32 क्रीडा शाखांमधील 329 स्पर्धांमध्ये भाग घेण्यासाठी फ्रान्सच्या राजधानीत एकत्र येणार आहेत. ही स्पर्धा 26 जुलै रोजी सुरू झाली असून ती 11 ऑगस्ट रोजी संपणार आहेत. पॅरिस ऑलिंपिक 2024, ही या स्पर्धेची 33 वी आवृत्ती आहे. (हेही वाचा - France High-Speed Rail Hit by Acts of Vandalism: पॅरिसमध्ये ऑलिम्पिक उद्घाटन सोहळ्यापूर्वी फ्रान्सच्या हायस्पीड रेल्वे मार्गावर जाळपोळ आणि तोडफोड; आठ लाख प्रवासी प्रभावित)

70 भारतीय खेळाडू पहिल्यांदाच ऑलिम्पिकमध्ये खेळणार -

भारतीय ऑलिम्पिक संघटनेने 117 खेळाडूंचा संघ पॅरिसला पाठवला आहे. यापैकी 70 खेळाडू असे आहेत जे पहिल्यांदाच ऑलिम्पिकमध्ये खेळणार आहेत. त्याच वेळी, 47 भारतीय खेळाडूंनी एक किंवा अधिक वेळा ऑलिम्पिकमध्ये भाग घेतला आहे. नीरज चोप्रा, मीराबाई चानू आणि पीव्ही सिंधू यांच्यासह अनेक खेळाडूंकडून पॅरिस ऑलिम्पिकमध्ये पुन्हा एकदा पदकांची अपेक्षा आहे.