France High-Speed Rail Hit by Acts of Vandalism (PC - X/@Crazynews4real)

France High-Speed Rail Hit by Acts of Vandalism: पॅरिस (Paris) मध्ये ऑलिम्पिक उद्घाटन सोहळ्यापूर्वी (Olympic Opening ceremony) फ्रान्सच्या हायस्पीड रेल्वे मार्गावर (France High-Speed Rail) जाळपोळ आणि तोडफोड झाल्याची घटना घडली आहे. यासंदर्भात फ्रान्सच्या राष्ट्रीय रेल्वे कंपनी एसएनसीएफने शुक्रवारी एक निवेदन जारी केले आहे. या घटनेमुळे रेल्वे वाहतुकीवर मोठा परिणाम झाला आहे. विशेष म्हणजे पॅरिस ऑलिम्पिक आजपासून सुरू होत असून उद्घाटन सोहळा आजच होणार आहे. जगभरातील क्रीडाप्रेमी पॅरिसला पोहोचले असून अशा परिस्थितीत वाहतूक विस्कळीत झाल्याने त्यांना मोठ्या त्रासाला सामोरे जावे लागत आहे.

SNCF फ्रान्सच्या पश्चिम, उत्तर आणि पूर्वेकडील रेषा प्रभावित झाल्याची घोषणा केली. त्यामुळे शेजारील बेल्जियम आणि लंडनला जाणाऱ्या गाड्यांवरही परिणाम झाला. पॅरिस ऑलिम्पिकच्या उद्घाटन समारंभाच्या काही तास आधी, फ्रान्सच्या आसपास घडणाऱ्या घटनांचा सरकारी अधिकाऱ्यांनी निषेध केला. (हेही वाचा - Olympic Games Paris 2024 Google Doodle: ऑलिंपिक्स ची आज पासून सुरूवात; Google ने साकारलं खास डूडल!)

जाळपोळ आणि तोडफोडीच्या घटना का घडल्या याचा तपास करत असल्याचे फ्रेंच पोलिसांनी सांगितले आहे. या घटनांमुळे रेल्वेचे जाळे विस्कळीत झाले असून, मोठ्या प्रमाणात रेल्वे प्रवासी स्थानकांवर अडकून पडले. फ्रेंच मीडियाने रेल्वे नेटवर्कच्या पश्चिम मार्गावर आग लागल्याचे वृत्त दिले आहे. जाळपोळ आणि तोडफोडीच्या घटना ज्या पद्धतीने समन्वित पद्धतीने घडवून आणल्या त्यामागे कोणाचे षडयंत्र आहे, याचा तपास फ्रान्स पोलिस करत आहेत. (हेही वाचा -Paris Olympic Games 2024: पॅरिस ऑलिम्पिकमध्ये भारताची दमदार सुरुवात, तिरंदाजीमध्ये महिला संघाने उपांत्यपूर्व फेरीत मारली धडक.)

पहा व्हिडिओ - 

आठ लाख प्रवाशांना बसला फटका -

फ्रान्समध्ये अनेक गाड्यांचे मार्ग बदलण्यात आले असून अनेक गाड्या रद्द कराव्या लागल्या आहेत. SNCF ने लोकांना त्यांचे प्रवास तात्काळ रद्द करण्याचे आवाहन केले आहे आणि त्यांना रेल्वे स्थानकांपासून दूर राहण्याचा सल्ला दिला आहे. मीडिया रिपोर्ट्सनुसार, जाळपोळ आणि तोडफोडीच्या घटनांमुळे सुमारे आठ लाख प्रवासी प्रभावित झाले आहेत.