Fake Antivirus App: गुगल प्ले स्टोरवर असलेले अॅंटी व्हायरस अॅप बनावट, तुमच्या फोनमध्ये डाऊनलोड केल्यास या बाबींचा धोका
Representational Image | (Photo Credits: File Photo)

आपल्या फोनला व्हायरस (Virus) पासून दूर ठेवण्यासाठी आपण कायमचं अॅंटी व्हायरसचा (Anti Virus) वापर करतो. म्हणजे आपला फोन आपण सहज व्हायरसमुक्त (Virus Free) ठेवू शकतो. तरी अनरॉईड फोनवर (Anroid Free) प्लेस्टोर (Play Store) कडून काही अॅंटी व्हासरस अप आहेत जे डाऊनलोड (Download) करुन आपण सहज आपला फोन व्हायरस (Virus) पासून दुर ठेवू शकतो अशी समज होती. पण प्लेस्टोरवर (Play Store) उपलब्ध असलेल्या या अॅंपबाबत काही धक्कादायक माहिती पुढे आली आहे. प्लेस्टोरवर उपलब्ध असलेले हे सगळे अॅंटी व्हायरस अॅंप बनावट आहेत. म्हणजेच या अपमध्ये शार्कबोट मालवेअर (Shark Boat Malware) असल्याची धक्कादायक माहिती पुढे येत आहे. तरी हा मालवेअर फोनसाठी अतिधोकादायक असुन यातून तुमची प्रायव्हसी धोक्यात येवू शकते.

 

शार्कबोट मालवेअरच्या (Shark Boat Malware) माध्यमातून तुमच्या फोनमध्ये (Phone) सेव्ह (Save) असलेला तुमचा बॅँक डेटा (Bank Data) सहज लिक  होवू शकतो. तरी हा कुठलाही अटी व्हायरस अॅप डाऊनलोड (App Download) न करणं हा यावरचा सर्वोत्तम उपाय ठरु शकतो. तरी आता पर्यत 60 हजारांहून अधिक मोबाईल (Mobile) वापरकर्त्यांच्या मोबाईलमध्ये शार्कबोट मालवेअरचा (Shark Boat Malware) आघात झाला आहे. बरेच मोबाईल युजर्सचा (Mobile User) डेटा हॅक (Data Hack) झाला आहे. तरी कुठल्याही नवीन अॅंटी व्हायरस (Anti Virus) अप डाऊनलोड (App Download) करणं सध्या धोक्याचं ठरत आहे. (हे ही वाचा:- iPhone Price Update: iPhone 14 च्या लॉंच नंतर iPhone 13 सह iPhone च्या इतरही मॉडेलच्या दरात मोठी कपात, जाणून घ्या iPhone 13 आणि iPhone 12 ची नवी किंमत)

 

तरी भारतात (India) या मालवेअरचा अजुन फार परिणाम जाणवला नसला तरी स्पेन (Spain), ऑस्ट्रेलिया (Australia), पोलंड (Poland), जर्मनी (Germany), अमेरीकेत (America) शार्कबोट मालवेअरच्या (Shark Boat Malware) माध्यमातून बऱ्याच वापरकर्त्यांचा डेटा हॅक (Data Hack) झाल्याची माहिती मिळत आहे. तरी तुमच्या फोनमध्ये नवीन कुठलही अप डाऊनलोड (Download) करण्यापूर्वी सावधता बाळगा.