Idea And Vodaphone (Photo Credit: TheIndianWire)

अनेक दूरसंचार कंपन्यांनी टेरिफ प्लानचे दर वाढवलेले असताना आयडिया (Idea) आणि व्होडाफोन (Vodaphone) कंपनी आपल्या युजर्ससाठी एक खुशखबर घेऊन आली आहे. एअरटेल (Airtel) कंपनीच्या पाठोपाठच आता आयडिया आणि व्होडाफोननेही अन्य कोणत्याही नेटवर्कवर मोफत अनलिमिटेड कॉलिंग देणार असल्याचे समजत आहे. यापूर्वी एअरटेलने FUP मर्यादा हटवण्याचा निर्णय घेतला होता. नव्या टेरिफनंतर डेटा महाग होण्यासोबतच इतर नेटवर्कवर कॉलिंगसाठी मर्यादाही ठेवली होती. यामुळे ग्राहकांच्या खिशाला चांगलीच कात्री बसणार होती. मात्र ग्राहकांची नाराजी लक्षात घेता आता एयरटेल सहित आयडिया आणि व्होडाफोनने देखील फ्री अनलिमिटेड कॉलिंग (Free Unlimited Calling)  देण्याचा निर्णय घेतला आहे.

व्होडाफोन-आयडियाने नव्या निर्णयाची माहिती सोशल मीडियाच्या माध्यमातून दिली. ‘फ्रीचा अर्थ आता फ्री होतो. आमच्या ट्रुली अनलिमिटेड प्लानमध्ये आता कोणत्याही नेटवर्कवर मोफत कॉलिंगचा आनंद घ्या’, असं ट्वीट करुन माहिती देण्यात आली. एअरटेल, व्होडाफोन आणि आयडियाचे नवीन प्लान 3  डिसेंबरपासून, तर जिओचे प्लान 6 डिसेंबरपासून लागू झाले आहेत. Airtel ची मोठी घोषणा, आता अन्य नेटवर्कवर अनलिमिटेड फ्री कॉलिंग करता येणार

ट्विट

दरम्यान,  याआधी व्होडाफोन-आयडिया ग्राहकांना 28 दिवसांच्या प्लानमध्ये इतर नेटवर्कवर कॉलिंगसाठी एक हजार मिनिटे दिली जात होती. तर, 84 दिवसांच्या प्लानमध्ये 3000 मिनिट होते. दुसरीकडे, रिलायन्स जिओनेही यावर्षी ऑक्टोबरपासून आययूसी शुल्क आकारणं सुरू केलं होतं. हे शुल्क लागू झाल्यापासून जिओ ते जिओ कॉलिंग मोफत आहे, मात्र इतर नेटवर्कवर कॉलिंगसाठी शुल्क आकारले जात आहे. अशा सर्व कंपन्यांच्या दरवाढीने ग्राहकांची चांगलीच कोंडी झाली होती.