QR कोड न वापरता करता येईल WhatsApp Web चे लॉगिन, जाणून घ्या सोप्पी ट्रिक
WhatsApp (Photo Credits: WhatsApp)

इंन्स्टंट मॅसेजिंग अॅप WhatsApp आपल्या युजर्ससाठी नेहमीच नवे फिचर्स रोलआउट करत असतो. ज्यामुळे युजर्सचा चॅटिंग करताना विविध स्टिकर्स किंवा इमोजीचा वापर करुन त्याचा आनंद घेता येतो. अशातच व्हॉट्सअॅप युजर्सला डेस्कटॉपवर सुद्धा ते सुरु करण्याची सुविधा देत आहे. परंतु सध्या डेस्कटॉपवर व्हॉट्सअॅप सुरु करण्यासाठी QR कोड विचारला जातो. त्यानंतरच तुमचे व्हॉट्सअॅप अकाउंट तुमच्या कंप्युटर किंवा लॅपटॉवर सुरु होते.  पण तुम्ही क्यूआर कोड शिवाय सुद्धा डेस्कटॉप व्हॉट्सअॅप सुरु करता येणार आहे. पण त्यासाठी तुम्ही खाली दिलेल्या सोप्प्या ट्रिक्स जरुर वाचा.

WhatsApp Web क्यूरआर कोड न वापरता तुम्हाला तुमचे व्हॉट्सअॅप अकाउंट सुरु करयाचे असल्यास फक्त काही सोप्प्या ट्रिक्स फॉलो कराव्या लागणार आहेत. तर येथे जाणून घ्या अधिक त्याबद्दल माहिती.(WhatsApp New Privacy Policy 'या' तारखेपर्यंत स्वीकारावी लागणार; अॅपमध्ये दिसणार पॉलिसीबद्दल अधिक माहिती)

-यासाठी तुम्हाला प्रथम तुमच्या डेस्कटॉपवर BlueStacks डाऊलोड करावे लागणार आहे.

-डाऊनलोड केल्यानंतर BlueStacks सुरु करण्यासाठी ऑप्शन दिसेल.

-येथे तुम्हाला तुमचा फोन क्रमांक द्यावा लागणार आहे. त्यावर वेरिफिकेशन कोड सुद्धा विचारला जाणार आहे,

-फोन क्रमांक दिल्यानंतर क्यूआर कोडशिवाय WhatsApp तुमच्या डेस्कटॉपवर इंस्टॉल होईल.

-डेस्कटॉपवर व्हॉट्सअॅप इंस्टॉल झाल्यानंतर आता Menu बटणावर क्लिक करुन Manage Contact च्या ऑप्शनवर क्लिक करा. त्याच्या मदतीने तुम्हाला ज्यांच्यासोबत चॅट करायचे आहे त्यांचे क्रमांक अॅड करता येणार आहेत.

- फोनमध्ये असलेलेच क्रमांक तुम्हाला येथे चॅटिंगसाठी वापरता येणार आहेत.

(हेही वाचा- कंप्युटरचा Keyboard इंग्रजी बाराखडीनुसार का सेट केला जात नाही? जाणून घ्या कारण)

तर वरील काही सोप्प्या स्टेप्स वापरुन तुम्हाला क्यूआर कोडशिवाय व्हॉट्सअॅप सुरु करता येणार आहे. तसेच व्हॉट्सअॅप संदर्भात नवे अपडेट्स जाणून घेण्यासाठी तुम्ही तुमच्या स्मार्टफोनच्या प्ले स्टोअरवर जाऊन ते तपासून पाहू शकता.