Representational Image (Photo Credit: File Photo)

स्मार्टफोन आपल्या आयुष्यातील एक महत्वाचा भाग बनला आहे. मनोरंजन, संवाद आणि माहिती मिळवण्यासह अन्य काही कामांसाठी स्मार्टफोनचा सर्वाधिक वापर केला जातो. परंतु स्मार्टफोनचा तुम्ही जेवढा अधिक वापर कराल तेवढी अधिक त्याची बॅटरी लाइफ कमी होण्याची शक्यता असते. कारण त्यावेळी स्मार्टफोनमध्ये काही वेळेस आपण 2-3 अॅपचा वापर करत असल्याने ते बंद करण्याचे ही विसरतो. या कारणामुळे सुद्धा तुमची बॅटरी लाइफ कमी होऊ शकते. पण आज आम्ही तुम्हाला अशा काही गोष्टी सांगणार आहोत ज्यामुळे तुम्ही स्मार्टफोनची बॅटरी लाइफ वाढवू शकता.

स्मार्टफोनची बॅटरी लाइफ वाढवायची असल्यास तुम्ही फोनमध्ये GPS सुरु ठेवले आहे का ते तपासून पहा. असे असल्यास तुम्ही जीपीएसचा वापर करत नसल्यास ते बंद करा. अन्यथा तुमच्या मोबाइलची बॅटरी कमी होईल. जीपीएससह Bluetooth सुद्धा तुमच्या मोबाईलची बॅटरी करु शकतो. त्यासाठी सुद्धा जीपीएस सारखीच हिच पद्धत वापरा.(एकाच मोबाईलवर दोन WhatsApp अकाउंट कसे वापराल? जाणून घ्या 'या' सोप्प्या ट्रिक्स)

आपण वापरत असलेल्या स्मार्टफोन मधील डिस्प्ले हा मुख्य भुमिका बजावतो. जर फोनचा ब्राइटनेस अधिक असल्यास बॅटरी वेगाने कमी होण्याची शक्यता असते. त्यामुळे तुम्ही बॅटरी सेव्हर फिचर अथवा ब्राइटनेस कमी करु शकता. तसेच स्मार्टफोनच्या Background मध्ये सुरु असलेले अॅप तुम्ही बंद करा. कारण खुप अॅप्स सुरु राहिल्यास त्यासाठी तुमच्या मोबाईलची बॅटरी खर्चिक होऊ शकते.(Useful WhatsApp Tip: अनोळखी व्यक्तींद्वारा व्हॉट्सअॅप ग्रुपमध्ये Add होऊन झाला आहात त्रस्त, 'या' टिप ने तुमच्या परवानगीशिवाय कोणी करु शकत नाही तुम्हाला अॅड)

अजून एक महत्वाची गोष्ट म्हणजे Always On Display Feature तुम्ही Off करुन ठेऊ शकता. जेणेकरुन तुमची बॅटरी कमी वापरली जाईल. तसेच हे फिचर ऑफ करण्यासाठी सेटिंग्स मध्ये जाऊन बंद करता येणार आहे. त्याचसोबत आपण काही वेळेस स्मार्टफोनवर Live Wallpapers सुद्धा ठेवतो. हे वॉलपेपर स्क्रिनला हाय रेटवर रिफ्रेश करण्यासह Visits आणि Live Wallpapers अपडेट राहण्यासाठी फोनच्या रिसोर्सेजचा वापर करतात. त्यामुळे तुमची बॅटरी लाइफ कमी होईल.