Netflix (File Image)

सध्या संपूर्ण जगाला OTT प्लॅटफॉर्मचे वेड लागले आहे. लॉकडाऊनच्या काळात हे वेड आणखीनच वाढले. घराबाहेर पडता येत नसल्याकारणाने घरात राहूनच लोकांनी NetFlix,Disney Hotstar +, Amazon Prime यांसारख्या OTT प्लॅटफॉर्मच्या माध्यमातून अनेक वेबसीरिज, चित्रपट पाहिले. यामुळे लोकांच्या सोयीसाठी म्हणून नेटफ्लिक्सने हिंदी भाषेतील (Hindi Language) फिचर्स आणले. ज्यामुळे ज्यांना इंग्रजी फारसं समजत नाही त्यांना सोपे पडेल. मात्र अनेकांना नेटफ्लिक्समध्ये याची सेटिंग कशी करायची हेच बहुधा माहिती नसावे. म्हणून लोकांच्या आग्रहास्तव याची सेटिंग करायची याची माहिती आज आम्ही देणार आहोत.

तसे अनेकांकडे नेटफ्लिक्स अॅप असेलच. मात्र त्यात हिंदी भाषा निवडण्यासाठी काय करावे हे अनेकांना माहित नसेल. अशा लोकांसाठी काही सोप्या टिप्स. हेदेखील वाचाZee5 HiPi शॉर्ट व्हिडिओ प्लॅटफॉर्म लॉन्च, युजर्सला TikTok ची कमतरता नाही जाणवणार

1. सर्वात आधी तुमचे अकाउंट वेब ब्राउझरने उघडा.

2. त्यानंतर प्राफाईल आणि मॅनेज प्राफाईल्स हा पर्याय निवडा.

3. मग Language पर्याय ड्रॉप डाऊन करा.

4. त्यातील हिंदी भाषेचा पर्याय निवडा.

5. मग तो पर्याय सेव करा.

अशा पद्धतीने तुम्ही NetFlix वर हिंदी भाषा इंटरफेस सेटिंग करु शकात. ज्यामुळे तुम्हाला हिंदीतून सर्व माहिती मिळेल आणि नेटफ्लिक्सचा आनंदही घेता येईल.

युजर्सला हिंदी इंटरफेस मोबाईल, टीव्ही आणि वेब डिवाइसवर उपलब्ध आहे. याचा फायदा असा होणार आहे की, युजर्सला इंटरनॅशलन शो, चित्रपट आणि वेब सीरिज हिंदी मध्ये सर्च करता येणार आहेत. त्याचसोबत उत्तम इंग्रजी असणाऱ्यांना सुद्धा हिंदी भाषेतील नेटफ्लिक्सचा वापर करणे सोपे होणार आहे. नेटफ्लिक्सच्या नव्या युजर्सला इंटरफेसमध्ये साइन-इन ते सर्च, कलेक्शन आणि पेमेंट पर्यंत मोबाईल, टीव्ही आणि वेब सहित सर्व डिवाइसेसवर हिंदी उपलब्ध होणार आहे.