WhatsApp Representation Image (Photo Credits: Pixabay)

जगप्रसिद्ध असणाऱ्या WhatsApp चे करोडोच्या संख्येने युजर्स आहेत. त्यामुळे चॅटिंगसाठी उत्तम मानल्या जाणाऱ्या अॅप पैकी हा एक आहे. युजर्सला खुश करण्यासाठी कंपनी नेहमीच नवे फिचर्स रोलआउट करत असते. फोटो-व्हिडिओ शेअरिंग करण्यासोबत युजर्सला व्हिडिओ कॉलिंगची सुद्धा सुविधा देण्यात आली आहे.  मात्र आज आम्ही तुम्हाला व्हॉट्सअॅपवर तुम्ही सर्वाधिक कोणासोबत बातचीत करता ते कसे तपासून पहायचे याबाबत अधिक सांगणार आहोत. (WhatsApp वरील डिलिट झालेले फोटो पुन्हा डाऊनलोड करण्यासाठी फॉलो करा 'या' सोप्या ट्रिक्स)

या ट्रिकच्या मदतीने तुम्हाला तुम्ही किती मेसेज पाठवले किंवा रिसिव्ह झाले याबाबत सुद्धा कळू शकणार आहे. त्याचसोबत तुम्ही एखाद्या युजर्ससोबत किती वेळा लोकेशन शेअर केले आहे ते सुद्धा पाहता येणार आहे. शेअर करण्यात आलेल्या मीडिया फाईल्स बाबत सुद्धा माहिती देते.  ऐवढेच नाही तुमच्या कॉन्टेक्ट लिस्टमधील कोणत्या युजर्ससोबत तुम्ही किती फाईल्स शेअर केल्या आणि चॅटिंगसंबंधित किती स्पेस व्यापला गेला आहे ते सुद्धा कळणार आहे. तर जाणून ही सोपी ट्रिक.(Wifi किंवा मोबाईल डेटा Slow झालाय? इंटरनेट स्पीड वाढवण्यासाठी 'या' टीप्स जरुर वापरा)

>>'या' स्टेप्स फॉलो करा

-सर्वात प्रथम व्हॉट्सअॅप सुरु करा

-Date and Storage येथे जा

-येथे आल्यावर Storage Usages वर टॅप करा

-तुम्हाला कॉन्टॅक्ट आणि चॅट संबंधित एक लिस्ट दाखवली जाईल

-लिस्टमध्ये सर्वाधिक स्टोरेज असलेले कॉन्टॅक्ट सर्वात प्रथम दाखवले जातील.

-शेअर करण्यात आलेल्या चॅट आणि मीडिया फाइल्स संबंधित माहितीसाठी कॉन्टॅक्टवर टॅप करा.

वरील सोप्या स्टेप्स वापरुन तुम्हाला तुम्ही जास्त कोणात्या व्यक्तीसोबत बोलता हे कळू शकणार आहे. तर काही दिवसांपूर्वी WABetaInfo यांच्या रिपोर्टनुसार, व्हॉट्सअॅपमुळे स्मार्टफोनमधील अधिक स्पेस सुद्धा व्यापला जातो. याच कारणास्तव आता कंपनी युजर्सची ही तक्रार दूर करण्यासाठी एक नव टूल लवकरच लॉन्च करणार आहे. व्हॉट्सअॅप त्यांच्या iOS आणि Android अॅप बीटा वर्जन मध्ये काही नवे फिचर्सची चाचणी करत आहे. त्यामध्ये काही लहान-मोठे बदल पहायला मिळाले आहेत. स्टोरेज संबंधित अॅपमध्ये एक नवे टूल टेस्टिंग नंतर लॉन्च करण्यात येण्याची शक्यता आहे.