Wifi किंवा मोबाईल डेटा Slow झालाय? इंटरनेट स्पीड वाढवण्यासाठी 'या' टीप्स जरुर वापरा
Internet shutdown (Photo Credits: Unsplash)

कोरोना व्हायरसमुळे देशभरात लॉकडाऊन जाहीर केल्यानंतर आता काही गोष्टी सुरु करण्यात आल्या आहेत. परंतु तरीही बहुतांश जण हे घरुनच ऑफिसचे काम करत आहेत. यामुळे सध्या इंटरनेटचा वापर पूर्वीपेक्षा दुप्पटीने वाढला आहे. युजर्सकडून ऑनलाईन गेम, वर्क फ्रॉम होम, स्ट्रिमिंग प्लॅटफॉर्मवर व्हिडिओ पाहण्यासाठी इंटरनेटचा प्रचंड प्रमाणात वापर करत आहेत. त्याचसोबत युजर्स काही गोष्टी अपलोड किंवा डाऊनलोड करण्यासाठी इंटरनेटचा वापर करत असल्याने काही वेळेस ते स्लो झाल्याची समस्या येत आहे. त्यामुळे जर तुमच्या इंटरनेटचा स्पीड स्लो झाल्यास 'या' टीप्स जरुर वापरा.

-इंटरनेटचा स्पीड कसा तपासून पहाल?

डेस्कटॉप किंवा लॅपटॉपवर इंटरनेट स्पीड तपासून पाहण्यासाठी तुम्हाला Web Browser येथे प्रथम जावे लागेल. त्यानंतर स्पीड टेस्टिंग करण्यासाठी speedtest.net किंवा fast.com या संकेतस्थळाला भेट द्या. तेथे तुम्हाला अपलोड आणि डाऊनलोडचा स्पीड दाखवला जाणार आहे. मोबाईलवर सुद्धा या संकेतस्थळांना भेट देता येणार आहे. गुगल प्ले स्टोर आणि अॅपल अॅप स्टोर येथून सुद्धा त्यासंबंधित अॅपचा वापर करुन इंटरनेटचा स्पीड किती आहे ते तपासून पाहता येणार आहे.

>>WiFi चा स्पीड 'या' पद्धतीने वाढेल

-जर तुम्ही वर्क फ्रॉम होम करत असल्यास 2Mbps प्लॅन किंवा मॅक्सिमम स्पीड 100Mbps असून वर्कलोड असल्यास तुम्हाला काम करण्यासाठी पाहिजे तेवढा स्पीड मिळणार नाही आहे. अशावेळी तुम्ही इंटरनेट सर्विस देणाऱ्या व्यक्तीशी संपर्क साधून उत्तम स्पीड देणारा इंटरनेट प्लॅन निवडू शकता.

-खुप वेळ ऑनलाईन राहिल्याने काही वेळेस राऊटर गरम किंवा काही ऑपरेशन इश्यू येऊ शकतात. त्यामुळे वायफाय राऊटर रीबूट करु शकता.(Twitter वर आता युजर्सला टाईप करावे लागणार नाही, कंपनीने रोलआउट केले Voice फिचर)

-त्यानंतर ही युजर्सला उत्तम इंटरनेट स्पीड मिळत नसल्यास डिवाइस पुन्हा एकदा वायफाय सोबत कनेक्ट करुन पहा. त्यावेळी तुम्हाला इंटरनेटचा स्पीड कशा पद्धतीने आहे ते कळणार आहे.

-वायफायवरुन एखादे डिवाइस अपडेट होत असल्यास अन्य डिवासइससाठी इंटरनेटचा स्पीड कमी दाखवला जाऊ शकतो. त्यामुळे याकडे सुद्धा लक्ष देऊ शकता.

>> 'या' पद्धतीने वाढवा मोबाईलचा डेटा स्पीड

-सर्वात प्रथम तुमच्या मोबाईलवर पूर्ण सिग्नल मिळत आहेत की नाही ते पहा. याचा परिणाम इंटरनेटच्या स्पीडवर सुद्धा होतो.

-टेलिकॉम कंपन्या युजर्सला दिवसासाठी इंटरनेटचा डेटा वापरण्यासाठी मर्यादा देतात. त्यामुळे तुम्ही डेली डेटाची मर्यादा ओलांडली तर नाही ना ते तपासून पहा. काही वेळेस गेम खेळणे किंवा चित्रपट पाहण्यासाठी काही तास त्यामध्ये आपण खर्चिक करतो. त्यामुळे डेटा संपण्याची शक्यता असता.

-काही वेळेस तुम्ही मोबाईल Airplane मोड ऑफ केल्यानंतर ऑन केल्यास तुम्हाला उत्तम इंटरनेट स्पीड मिळू शकतो.(WhatsApp मुळे स्मार्टफोनमधील स्टोरेज अधिक व्यापला जातोय? युजर्ससाठी लॉन्च होणार एक नवे टूल)

तसेच मोबाईल अपडेट होत असल्यास इंटरनेट स्पीड कमी होऊ शकतो. त्यावेळी तुम्ही मोबाईल मध्ये सुरु असलेले अॅप बंद करा. त्याचसोबत डिवाइस नेटवर्क सेटिंग्समध्ये बदलाव केल्यास तुम्हाला इंटरनेटचा स्पीड अधिक मिळू शकतो. तुम्ही तो रिसेट आणि डिवाइस रीबूट करु शकतात.