Twitter logo (Photo courtesy: Twitter)

मायक्रो ब्लॉगिंग साईट Twitter यांनी फेक न्यूजवर चाप बसवण्यासाठी एक नवे फिचर लॉन्च केले आहे. त्यानुसार लोकांमध्ये चुकीची माहिती देणे किंवा त्यांची फसवणुक करण्याचे प्रकार थांबवण्यासाठी कंपनीने ते फिचर आणले आहे. ऐवढेच नाही तर कंपनीने युजर्सला उत्तम सुविधा देण्यासाठी आणि अधिक प्रभावशाली करण्यासाठी एका नव्या फिचरवर काम करत आहे. गेल्या काही दिवसांपूर्वी समोर आलेल्या एका रिपोर्टनुसार असे सांगण्यात आले होते की, ट्वीटर सुद्धा सोशल मीडिया प्लॅटफॉर्म फेसबुक सारखेच इमोजी फिचर (Emoji Feature) घेऊन येणार असल्याचे सांगण्यात आले होते. याबाबत अद्याप टेस्टिंग सुरु आहे. याच चर्चांमध्ये कंपनीने एक खास फिचर रोलआउट केले आहे. जे पोस्ट केल्यानंतर युजर्सला कंपनी एक उत्तम सुविधा देत असल्याचा अनुभव येणार आहे.

ट्वीटरने Voice फिचर लॉन्च केले आहे. म्हणजेच आता युजर्,सला आवाज रेकॉर्ड करुन ट्वीट करता येणार आहे. यामुळे आता युजर्सला ट्वीट करताना टाईप करण्याची गरज पडणार नाही आहे. तर युजर्सच्या भावना आणि विचार फक्त एका ऑडिओच्या माध्यमातून शेअर करता येणार आहेत. हे फिचर युजर्ससाठी खरंच फायद्याचे ठरेल आणि टाईप करण्याचा सुद्धा त्यांचा वेळ वाचणार आहे.(फोनमधील फोटो Delete झाल्यास तुम्हाला परत मिळवता येणार, Android साठी येणार नवं दमदार फिचर) 

कंपनीने या वॉईस फिचर बाबतची माहिती ट्वीट करत दिली आहे. त्यामध्ये त्यांनी असे स्पष्ट केले आहे की, हे फिचर सध्या iOS साठी लॉन्च केले आहे. अद्याप अॅन्ड्रॉइड युजर्ससाठी हे फिचर रोलआउट केले नसून ते कधी उपलब्ध होईल याबाबत सुद्धा माहिती देण्यात आलेली नाही.