WhatsApp वरील डिलिट झालेले फोटो पुन्हा डाऊनलोड करण्यासाठी फॉलो करा 'या' सोप्या ट्रिक्स
WhatsApp Representation Image (Photo Credits: Pixabay)

जगप्रसिद्ध मेसेंजिग प्लॅटफॉर्म व्हॉट्सअॅपवर (WhatsApp) युजर्सला 30 दिवसांपूर्वीचे फोटो आणि व्हिडिओ सुद्धा डाऊनलोड करता येणार आहेत. मात्र याच दरम्यान तुमच्याकडून काही फोटो किंवा व्हिडिओ डिलिट (Delete) झाल्यास तर ते तुम्हाला पुन्हा डाऊनलोड करता येणार आहेत. खरंतर 30 दिवसांपेक्षा अधिक दिवस झाल्यास फोटो किंवा व्हिडिओ डाऊनलोड केल्यानंतर व्हॉट्सअॅपच्या सर्वरमधून ते डिलिट होतात. त्यामुळे ते पुन्हा डाऊनलोड करता येत नाहीत.

अॅन्ड्रॉइड युजर्सला व्हॉट्सअॅपवरील आपले फोटो, व्हिडिओ किंवा एखादी अटॅचमेंट सुरक्षित ठेवण्यासाठी सोपा मार्ग म्हणजे Gmail आहे. सर्व अॅन्ड्रॉइड स्मार्टफोन हे बाय डिफॉल्ट एका Gmail अकाउंट्ससोबत लिंक असतात. लिंक जीमेल अकाउंटच्या मदतीने युजर्सला त्यांचा व्हॉट्सअॅपवरील डेटा सुरक्षित ठेवता येतो. यासाठी युजर्सला अॅपच्या सेटिंग्समध्ये जाऊन Google Drive येथे बॅकअप घेता येणार आहे. त्यानंतर हा डेटा युजर्सला अन्य डिवाइसमध्ये स्टोर करता येणार आहे. इंटरनेटशिवाय Google Map चा 'या' पद्धतीने करा वापर

डिलिट झालेले फोटो 'या' पद्धतीने पुन्हा करा डाऊनलोड

व्हॉट्सअॅपवर अशा फाईल्स डाऊनलोड केल्या जाऊ शकतात ज्या डिलिट करण्यात आलेल्या नाहीत. मात्र जर तुम्ही एखाद्यासोबत केलेले चॅट पूर्णपणे डिलिट केले असल्यास ते तुम्हाला पुन्हा पाहता येणार नाही आहे. जर असे नसल्यास तुम्ही व्हॉट्सअॅप चॅट्स ओपन करा. त्यानंतर ज्या फाइल्स तुम्हाला पुन्हा डाऊनलोड करायच्या आहेत आणि ब्लर दिसत आहेत त्यावर टॅप करा. टॅप केल्यानंतर फाइल्स पुन्हा डाऊनलोड होते. मात्र फाईल्स रिसिव्ह झाल्याच्या 30 दिवसानंतर तुम्हाला त्या पुन्हा डाऊनलोड करता येणार नाही हे जरुर लक्षात ठेवा.

तसेच जर तुम्हाला Error, Can't Download, Please Ask That It Be Resent To You? असे मेजेस दाखवत असल्यास प्रथम इंटरनेट कनेक्शन तुमच्या स्मार्टफोनमध्ये आहे की नाही ते तपासून पहा. त्याचसोबत तुमच्या फोनचा डेटा आणि वेळ योग्य असावी जर हे चुकीचे असल्यास व्हॉट्सअॅप सर्वरसोबत तुम्हाला कनेक्ट होता येणार नाही. तसेच मोबाईल मधील स्टोरेज स्पेस नसल्यावरही युजर्सला Error मेसेज दाखवला जातो.