इंटरनेटशिवाय Google Map चा 'या' पद्धतीने करा वापर
Google Map (Photo Credits-File Image)

गुगल मॅपचा (Google Map) आपल्याला एखाद्या ठिकाणी जाण्यासाठी किंवा तेथून येण्यासाठी फायदेशीर ठरेल असा हा अॅप आहे. परंतु गुगल मॅपचा वापर करण्यासाठी इंटरनेटचा स्पीड सुद्धा तितकाच उत्तम असणे आवश्यक असते. मात्र काही वेळेस आपण ज्यावेळी गुगल मॅपचा वापर करतो त्यावेळी इंटरनेटचाा स्पीड कमी असल्याने आपल्याला नेमक्या कोणत्या मार्गाने जायचे आहे यामध्ये गोंधळ होतो. तसेच गुगल मॅप सुद्धा त्यावेळी काम करणे बंद करते. परंतु तुम्हाला माहिती आहे का इंटरनेटशिवाय सुद्धा तुम्ही गुगल मॅप कशा पद्धतीने वापरु शकता? जर तुम्ही एखाद्या रोड ट्रिपचे प्लॅनिंग करत असल्यास त्यावेळी इंटरनेटशिवाय गुगल मॅपचा ऑफलाईन पद्धतीने सुद्धा तुम्ही वापर करु शकता.(Google Maps चे नवे फिचर; कोविड-19 च्या संसर्गापासून सुरक्षित राहण्यासाठी करेल मदत)

गुगलच्या या फिचरच्या माध्यमातून युजर्सला एखाद्या ठिकाणचा मार्ग किंवा तेथील मॅप सहज डाऊनलोड करता येणार आहे. तसेच यासाठी युजर्सला इंटरनेटचा सुद्धा वापर करावा लागणार नाही आहे. जर जाणून घ्या इंटरनेटशिवाय कशा पद्धतीने तुम्ही Android आणि iOS मध्ये ऑफलाईन पद्धतीने गुगल मॅपचा वापर कराल.(WhatsApp Payments द्वारे पैशांची देवाण घेवाण कशी कराल? जाणून घ्या सोप्या स्टेप्स)

>>iPhone किंवा iPad वर या टेप्स वापरुन ऑफलाईन पद्धतीने सुरु करा गुगल मॅप

-तुमच्या आयफोन किंवा आयपॅड मध्ये सर्वात प्रथम Google Maps सुरु करा

-लक्षात असू द्या की गुगल मॅप सुरु करण्यासाठी इंटरनेट किंवा गुगल मॅपवर Sing In केलेले असावे

-तेथे गेल्यावर एखाद्याच्या ठिकाणचे नाव टाका

-त्यानंतर तुम्हाला ज्या ठिकाणी जायचे आहे त्याचा ठिकाणचा पत्ता टाकून More ऑप्शनवर क्लिक करा

-ऑफलाईन पद्धतीने मॅप वापरायचा असल्यास Download येथे क्लिक करा

>>Android फोनवर ऑफलाईनच्या 'या' पद्धतीने सुरु करा गुगल मॅप

-तुमच्या अॅन्ड्रॉइड फोन किंवा टॅबवर Google Map सुरु करा

-तुमचा मोबाईल इंटरनेटसोबत कनेक्ट किंवा Google Map मध्ये तुम्ही Sing In केलेले असावे

-तेथे एखाद्या ठिकाणचे नाव सर्च करा

-खाली दिलेल्या ठिकाणी ठिकाणचा पत्ता किंवा नाव टाकून सर्च केल्यास तेथे तुम्हाला मॅप दाखवला जाईल. तो मार्ग किंवा मॅप तुम्ही डाऊनलोड करु शकता.

गुगल मॅपवरुन एखाद्या ठिकाचा मार्ग किंवा मॅप डाऊनलोड केल्यानंतर तुम्हाला तो सामान्य पद्धतीनेच वापरता येणार आहे. जर तुमचे इंटरनेट कनेक्शन स्लो किंवा बंद झाल्यास तुम्हाला मार्ग समजण्यासाठी ऑफलाईन पद्धतीने मॅपचा वापर करता येणार आहे.