तुम्हाला आलेल्या Email चा अ‍ॅड्रेस ते लोकेशन 'या' सोप्प्या पद्धतीने तपासून पहा
Gmail | Representational Image | (Photo Credits: Twitter)

सध्या आपण सर्वजण ई-मेल पाठवण्यासाठी Gmail चा वापर करतो. काही वेळा आपल्याला असे ईमेल येतात त्याबद्दल माहिती नसते. तो ईमेल पाहिल्यानंतर आपल्याला विविध प्रश्न पडू लागतात आणि नक्की कोणी हा मेल केला असेल याचा विचार आपण करु लागतो.  जर तुम्ही सुद्धा अशा पद्धतीच्या समस्येतून जात असल्यास त्यावर सोप्पा उपाय आणि ट्रिक्स सुद्धा आहे. अगदी सहजपणे  तुम्ही नेमका मेल कोणत्या अॅड्रेसवरुन आला आहे आणि लोकेशन तपासून पाहू शकता. हा लेख तुम्ही पूर्ण वाचल्यास तो तुमच्यासाठी फायदेशीर ठरु शकतो. आज आम्ही तुम्हाला अशा काही सोप्प्या ट्रिक्स सांगणार आहोत, त्याच्या माध्यमातून तुम्हाला  ईमेलचे लोकेशन आणि अॅड्रेस बद्दल कळू शकणार  आहे.

पहिला मार्ग म्हणजे ईमेल आयडी सर्च करण्यासाठी तुम्ही pipl आणि Spokio च्या वेबसाइटचा वापर करु शकता. येथे तुम्हाला ईमेल सेंडरच्या लोकेशन व्यतिरिक्त अन्य काही डिटेल्स सुद्धा सहज मिळू शकणार आहेत. (Paytm युजर्ससाठी मोठी बातमी, पेमेंट करतेवेळी आता द्यावा लागणार नाही 'हा' शुल्क)

तर दुसरा पर्याय म्हणजे तुम्हाला ज्या ईमेलचा अॅड्रेस माहिती करुन घ्यायचा असल्यास त्यासाठी तुम्ही प्रथम जीमेल सुरु करा. आता तो मेल उघडा. उजव्या बाजूला तुम्हाला तीन डॉट असलेले बटण दिसून येईल. त्यावर क्लिक करा आणि SHOW ORIGINAL वर क्लिक करा. असे केल्यानंतर तुम्हाला स्क्रिनवर एक नवी विंडो सुरु झाल्याचे दिसून येईल. येथे तुम्हाला मेलचा IP Address मिळणार आहे. तो अॅड्रेस कॉपी केल्यानंतर Wolfram Alpha साइटवर जाऊन आयपी अॅड्रेस सर्च करता येईल. तुम्हाला लोकेशनची माहिती मिळेल. तो अॅड्रेस कॉपी करुन Wolfram Alpha साइटवर जाऊन आयपी अॅड्रेस सर्च करा. आता तुम्हाला लोकेशनची माहिती मिळेल.

तिसरा मार्ग म्हणजे तु्म्ही  फेसबुकच्या माध्यमातून ईमेल संबंधित माहिती मिळवू शकता. जर तुम्हाला वारंवार ईमेल पाठवला जात असेल तर त्याचा मेल आयडी कॉपी करुन फेसबुकवर असलेल्या सर्च बार मध्ये तपासून पहा. तर युजरकडून जर त्या मेल आयडीच्या नावाने अकाउंट सुरु केले असेल तर तुम्हाला माहिती मिळेल.(WhatsApp लवकरच सादर करेल खास फिचर; मोबाईल शिवाय Desktop वर करता येईल लॉगइन)

जीमेल चे सुद्धा काही खास फिचर्स आहेत. त्याच्या माध्यमातून सुद्धा तुम्ही ईमेलचा अॅड्रेस आणि लोकेशन तपासून पाहू शकता. तर जीमेल वरील Auto Advance च्या माध्यमातून महत्वाची नसलेले ईमेल आपोआप डिलिट होतात. यामध्ये एक मेल डिलिट झाल्यानंतर दुसरा ही त्याच प्रकारे डिलिट होतो. म्हणजेच पुन्हा बॅक करुन इनबॉक्समध्ये  जावे लागणार नाही आहे. यासाठी तुम्हाला सेटिंग्स मध्ये जाऊन अॅडवान्स ऑप्शन निवडावा. येथे Auto Advance ऑप्शन दाखवला जाईल त्याचे बटण टर्न ऑन करा.