'Honor 20' स्मार्टफोनचा आज दुपारी 12 वाजता फ्लिपकार्टवर सुरु होणार पहिला फ्लॅशसेल, जाणून घ्या याचे आकर्षक फिचर्स
Honor 20 (Photo Credits: Facebook)

बहुचर्चित आणि बहुप्रतिक्षित Honor 20 स्मार्टफोनचा आज दुपारी 12 वाजल्यापासून फ्लिपकार्ट (Flipkart) या ई-कॉमर्स साइटवर सेल सुरु होणार आहे. मागच्या या स्मार्टफोनचा Honor 20i आणि Honor 20 Pro हा वेरियंट लाँच झाले होते. Honor 20 या स्मार्टफोनची किंमत 32,999 रुपये इतकी आहे. यात 6GB रॅम आणि 128GB अंतर्गत स्टोरेज देण्यात आले आहे.

Axis Bank Buzz क्रेडिट कार्ड धारकांना या सेलमध्ये Honor 20 स्मार्टफोनवर अतिरिक्त 5% सूट मिळणार आहे. तर Reliance Jio यूजर्संना 2200 रुपयांचे कॅशबॅक आणि 125GB 4G डेटा मिळणार आहे.

Honor 20 या स्मार्टफोनमध्ये 6.26 इंचाची स्क्रीन 2340x1080 पिक्सेल रिझोल्युशन आणि 91.7 % रेश्यो देण्यात आला आहे. हा स्मार्टफोन मिडनाइट ब्लॅक आणि सॅपियर ब्लू या रंगात उपलब्ध होईल.

हेही वाचा - Honor 8C भारतात लॉन्च; पाहा फिचर्स, किंमत आणि बरंच काही

या स्मार्टफोनमध्ये 48MP चा कॅमेरा आणि 16MP चा वाइड अँगल लेन्स कॅमेरा देण्यात आला आहे. तसेच यात 32MP चा सेल्फी कॅमेरा देण्यात आला आहे.

Honor 20 स्मार्टफोनमध्ये 3750mAh क्षमतेची बॅटरी देण्यात आली आहे. कनेक्टिव्हिटीसाठी यात 3G, 4G LTE, वायफाय आणि GPS सेवा देण्यात आली आहे.