Honor 8C भारतात लॉन्च; पाहा फिचर्स, किंमत आणि बरंच काही
Honor 8C (Photo Credits: Twitter)

Honor 8c mobile launch India: प्रदीर्घ उत्सुकतेनंतर अखेर Honor या चीनी कंपनीने Honor 8C हा आपला नावा स्मार्टफोन भारतात लॉन्च केला आहे. या हॅंडसेटची एक्सक्लूसिव विक्री ई-कॉमर्स साईट अॅमेझॉन डॉट इन (Amazon.in)  वर होईल. तसेच, हा मोबाईल Honorची अधिकृत वेबसाईट HiHonor.com वरही ग्राहकांना उपलब्ध होऊ शकतो. भारतात हा स्मार्टफोन 4GB रॅम आणि 32GB स्टोरेजसह 11,999 रूपये आणि 4 GB रॅम आणि 64 GB स्टोरेजसह 12,999 रुपयांना मिळू शकतो.

लॉन्चिंग ऑफरमध्ये Honor 8C खरेदी करणाऱ्या ग्राहकाला जियो युजर्सकडून 2,200 रुपयांची कॅशबॅक ऑफरही देण्यात आली आहे. दरम्यान, ही कॅशबॅक ऑफर 30 नोव्हेंबर ते 20 फेब्रुवारी 2019 पर्यंतच सुरु असेन. युजर्सला कॅशबॅक व्हाऊचर रुपात मिळेल. ज्यात 50 रुपयांचे 44 व्हाऊचर्स मिळतील. याचा वापर करुन युजर्स 198/299 रुपयांचे रिचार्ज करु शकतात. पण, एका वेळी रिचार्सजाठी ग्राहकाला एकच कूपन वापरता येईल. रिचार्जवेळी ग्राहकाला 10-10GB अतिरिक्त डेटाही मिळेन. म्हणजेच 100G डेटा अधिक मिळेल. या व्हाऊचर्सची वैधता 31 मार्च 2023 पर्यंत आहे.

हा फोन Honor 7Cचे पुढेच व्हर्जन असून भारतात हा मोबाईल Honor 8C नावाने लॉन्च झालाआहे. या फोन बाबत सोशल मीडियात नेटीझन्सना बरीच उत्सुकता आहे. Honor 8Cला ग्राहक ऑरोरा ब्लू, मॅजिक नाईट ब्लॅक, प्लॅटिनम गोल्ड आणि नेब्यूल पर्पल कलरमध्येही खरेदी करु शकतात. फोनच्या स्पेसिफिकेशनबाबत बोलायचे तर, हा स्मार्टफोन आऊट ऑफ बॉक्स अॅंड्रॉईड 8.1 ओरियोवर आधारीत एमयूआय8.2वर काम करतो. यात 6.26 इंचचा एचडी+ (720X1520पिक्सल) टीएफटी एलसीडी आयपीएस डिस्प्ले आहे. ज्याचा अॅस्पेक्ट रेशो 19.9 आहे. (हेही वाचा, तुम्हीही विश्वास ठेवता स्मार्टफोनसंदर्भात असणाऱ्या या काही चुकीच्या अफवांवर?)

Honor 8Cमध्ये असे दोन कॅमेरे दिले आहेत. पहिला कॅमेरा 13 मेगापिक्सल आणि दुसरा एफ/2.4 अपर्चरसोबत 2 मेगापिक्सलचा आहे. तर, फ्रंट कॅमेरा 8 मेगापिक्सल सेल्फी कॅमेरा आहे. ज्याचे अपार्चर एफ/2.0 आहे. दोन्हीतही एलईडी फ्लॅश आहे. फोनला 4000 एमएएच बॅटरी आहे.

Honor 8Cमे कनेक्टिव्हीटीसाठी 4जी व्हीओएलटीई, वाय-फाय 8.02.11बीज/जी/एन, ब्लुटूथ 4.2, जीपीएस/ए-जीपीएस, ग्लोनास, मायक्रो-यूएसबी पोर्ट आणि 3.5 एमएम हेडफोन आहे. फिंगरप्रिंट सेन्सर आणि फेस अनलॉकही देण्यात आला आहे. फोनचे डायमेन्शन 158.72X75.9X7.98 मिलीमिटर आहे. आणि वजन 167.2 आहे. हा स्मार्टफोन कंपनीने आजच लॉन्च केला आहे.