Google Pixel 3A and Google Pixel 3A XL लॉन्च, पहा काय आहेत फिचर्स आणि किंमत
Google Pixel 3AXL (Photo Credits: Twitter)

गुगलने दोन नवे स्मार्टफोन्स लॉन्च केले आहेत. गुगल पिक्सल 3ए (Google Pixel 3A ) आणि पिक्सल 3ए एक्सएल (Google Pixel 3A XL) असे हे दोन नवे स्मार्टफोन्स असून गुगलचे हे सर्वात स्वस्त स्मार्टफोन्स आहेत. सॅमसंग आणि अॅप्पलच्या स्मार्टफोन्सला टक्कर देण्यासाठी गुगलने पिक्सल 3ए सिरीजमध्ये दोन फोन सादर केले आहेत. यात ग्राहकांना पिक्सल एप्स मिळेल. तसंच यात तुम्हाला पिक्सल फोटोग्राफी सॉफ्टवेअर मिळेल. या फोनमध्ये पिक्सल 3 आणि पिक्सल 3 एक्सएलच्या तुलनेत स्वस्त हार्डवेअरचा वापर केला आहे.

गुगल पिक्सल 3ए आणि गुगल पिक्सल 3ए एक्सएल फिचर्स

या दोन्ही स्मार्टफोन्समध्ये गुगलने बजेट सेगमेंट हार्डवेअरचा वापर केला आहे. यात सिंगल सिम सपोर्ट करेल. तर भारतात हा फोन ई-सिम सपोर्टसह मिळेल. पिक्सल 3ए आणि पिक्सल 3ए एक्सएल स्मार्टफोनमध्ये अॅनरॉईड 9.0 वर चालेल. त्याचबरोबर दोन्ही फोनमध्ये कमीत कमी 3 वर्षांपर्यंत ऑपरेटिंग सिस्टम आणि सिक्युरिटी अपडेट मिळेल, असा दावा कंपनीने केला आहे. पिक्सल 3ए आणि पिक्सल 3ए एक्सएल दोन्ही स्मार्टफोन्समध्ये 4जीबी रॅम आणि 64 जीबी स्टोरेज मिळेल.

पिक्सल 3ए मध्ये 5.6 इंचाचा फुल एचडी प्लस जीओलेड डिस्प्ले दिला आहे. तर पिक्सल 3ए एक्सएलमध्ये 6 इंचाचा फुल एचडी प्लस जीओलेड डिस्प्ले दिला आहे. यात ड्रॅगन ट्रॅल ग्लास देखील आहे. दोन्ही स्मार्टफोन्समध्ये 12.2 मेगापिक्सलचा सिंगर रिअर कॅमेरा देण्यात आला आहे. तर फ्रंट कॅमेरा 8 मेगापिक्सलचा आहे. पिक्सल 3 ए मध्ये 3,700 एमएएच बॅटरी देण्यात आली आहे. याशिवाय दोन्ही फोन्समध्ये 18 वॉटचा चार्जर दिला आहे.

गुगल पिक्सल 3ए आणि गुगल पिक्सल 3ए एक्सएल किंमत

भारतात गुगल पिक्सल 3ए स्मार्टफोनची किंमत 39,999 रुपये आहे. तर गुगल पिक्सल 3ए एक्सएलची किंमत 44,999 रुपये आहे. दोन्ही स्मार्टफोन्स 4जीबी रॅम आणि 64 जीबी स्टोरेज वेरिएंटसह उपलब्ध आहेत. भारतात हे फोन्स 15 मे रोजी लॉन्च होणार आहेत.

तर 8 मे पासून फ्लिपकार्टवर रजिस्ट्रेशन सुरु होईल. गुगलचे हे स्मार्टफोन्स क्लियर व्हाईट, जस्ट ब्लॅक आणि पर्पल या तीन रंगात उपलब्ध होतील. अमेरिकन बाजारात पिक्सल 3ए स्मार्टफोन 399 डॉलर म्हणजे 28 हजार रुपये आणि पिक्सल 3ए एक्सएल स्मार्टफोन 479 डॉलर म्हणजे सुमारे 33,500 रुपयांना उपलब्ध आहेत.