अॅन्ड्रॉइड युजर्ससाठी एक वाईट बातमी आहे. कारण गुगलने जुन्या ऑपरेटिंग सिस्टिमच्या स्मार्टफोन मध्ये Google Maps, Gmail आमि YouTube सपोर्ट देणार नसल्याची घोषणा केली आहे. कंपनीने असे म्हटले की, युके मध्ये 27 सप्टेंबर मध्ये जुन्या अॅन्ड्रॉइड ऑपरेटिंग सिस्टमच्या युजर्सला गुगल अकाउंट्स लॉग-इन करता येणार नाही आहेत. गुगलच्या मते, अॅन्ड्रॉइड वर्जन 2.3 चा वापर करणाऱ्या युजर्सला 27 सप्टेंबर पासून गुगल मॅप, युट्युब आणि जीमेलचा वापर करता येणार नाही आहे. ही माहिती एक्सप्रेस युकेच्या रिपोर्टमधून दिली आहे. दरम्यान, कंपनीने भारतीय युजर्ससाठी हे अॅप काम करणार की नाही याबद्दल स्पष्ट केलेले नाही.
कंपनीचे असे म्हणणे आहे की, अॅन्ड्रॉइड 2.3 वर्जन हे जुने झाले आहे. अशातच त्यांचा खासगी डेटा लीक होऊ शकतो. यासाठी जुन्या प्लॅटफॉर्मवर गुगल मॅप्स, युट्यूब आणि जीमेलचा सपोर्ट न देण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. यामुळे युजर्सचा डेटा सुरक्षित राहू शकतो. तर अॅन्ड्रॉइड 2.3 Gingerbread हे 2010 मध्ये लॉन्च केले होते.(Facebook वाचत आहे तुमच्या WhatsApp चे प्रायव्हेट मेसेजेस; एजन्सींसोबत शेअर केले जात आहे चॅट्स, ProPublica अहवालातून धक्कादायक माहिती समोर)
Google चे मोबाईल अॅप्स वापरण्यासाठी, युजर्सकडे किमान Android 3.0 वर्जन असलेले डिव्हाइस असणे आवश्यक आहे. यासाठी युजर्सला फोनच्या सेटिंग्जवर जाऊन सॉफ्टवेअर अपडेट करू शकतात किंवा लेटेस्ट अँड्रॉइड 11 असलेले डिव्हाइस खरेदी करू शकतात.
गुगलने अलीकडेच अँड्रॉइड 12 ची शेवटची बीटा वर्जन लाँच केले आहे. अँड्रॉइड 12 बीटा 5 मध्ये अनेक वैशिष्ट्ये सुधारली गेली आहेत. यासह, गुगल क्लॉक अॅप देखील अपडेट मध्ये पुन्हा डिझाइन केले गेले आहे. या व्यतिरिक्त, वापरकर्त्यांना नवीन बीटा अपडेटमध्ये डिव्हाइस कंट्रोल शॉर्टकट मिळेल. याद्वारे युजर्सला स्मार्ट उपकरणे सहज वापरू शकतील. अशी अपेक्षा आहे की कंपनी लवकरच या वर्जनचे एक स्थिर अपडेट जारी करेल.