
दिवसेंदिवस वाढत चाललेली नागरिकांची संख्या आणि त्यात आणखी गाड्यांची सुद्धा भर पडत आहे. त्यामुळे कधी बाहेर फिरायला किंवा कामानिमत्त गाडी घेऊन जायचे असल्यास प्रथम पार्किंग कुठे करणार हा प्रश्न उद्भवतो. बहुतांश वेळेस काही ठिकाणी पार्किंग करणे सुद्धा मनाई असते. मात्र आता गाडी चालकांना पार्किंस स्पेस कुठे रिकामा आहे हे गुगल मॅपच्या माध्यमातून सांगितले जाणार आहे. तर एका निश्चित लोकेशनच्या येथे तुम्ही गेले असाल आणि त्या ठिकाणी कुठे पार्किंग स्पेस रिकामा असणार हे मॅप तुम्हाला सांगणार आहे.
पार्किंग स्पेस रिकामा असल्याचा ठिकाणी तुम्ही गाडी लावून तुम्ही तुमच्या कामासाठी जाऊ शकणार आहात. मात्र जर तुम्ही अद्याप या फिचर्सचा वापर करत नसाल तर आम्ही तुम्हाला ते कसे वापरायचे याबाबत माहिती देणार आहोत. गुगल मॅप तुम्हाला कार पार्किंग नेमक्या कोणत्या ठिकाणी करायची आह हे सांगणार नाही आहे. पण ज्या ठिकाणी तुम्ही कार पार्किंग करु शकता अशा जागांचे ऑप्शन दाखवले जाणार आहे.(Whatsapp वापरकर्त्यांनो सावधान! New Year’s Virus लिंकवर क्लिक कराल तर, होईल मोठे नुकसान)
कसा शोधाल गुगल मॅपवरुन पार्किंस स्पेस?
- सर्वात प्रथम गुगल मॅप सुरु करुन त्यामध्ये लोकेशन टाका.
-खाली दाखवल्या जाणाऱ्या 'Direction' ऑप्शनवर क्लिक करावे.
त्यानंतर सर्वात खाली 'Start' बॉटम बारला स्टाइल करा.
-असे केल्यानंतर तुम्हाला पार्किंचा 'P' चिन्ह दाखवले जाईल. जो तुम्हाला तुमच्या डेस्टिनेशनच्या आसपास पार्किंग स्पेस सहज उपलब्ध आहे की नाही दाखवले जाणार आहे.
सर्वात मुख्य बाब म्हणजे तुमच्या स्मार्टफोनवर गुगल मॅपचे लेटेस्ट वर्जन असणे आवश्यक आहे. असे नसेल तर आधी प्ले स्टोर किंवा अॅप स्टोर मध्ये जाऊन ते अपडेट करा. स्मार्टफोनमध्ये इंटरनेटोबत लोकेशन सर्विस सुद्धा अॅक्टिव्ह असणे गरजेचे आहे.