व्यवसायवृद्धीची संधी; आता Google Map वरून करता येणार मेसेज
प्रातिनिधिक प्रतिमा (Photo Credit: New York Post)

सध्याच्या धावपळीच्या काळात सर्वात जास्त उपयोगी ठरणारे अॅप म्हणजे गुगल मॅप (Google Map). या अॅपच्या मदतीने  जगाच्या पाठीवर तुम्ही कुठेही फिरू शकता. गुगल मॅपनेदेखील वेळोवेळी नवनवीन फीचर्स उपलब्ध करून दिले ज्यामुळे अनोळखी ठिकाणी पोहचणे आता खूपच सोपे झाले आहे. आता गुगल मॅप त्याच्या व्यावसायिक वापरकर्त्यांसाठी एक नवीन भन्नाट फीचर घेऊन येत आहे. तर आपल्या मॅपमध्ये गुगल लवकरच टेक्स्ट मेसेज फिचरचा समावेश करणार आहे,

ज्या लोकांना गुगल मॅपच्या मदतीने व्यवसाय करायचा आहे खास त्यांच्यासाठी गुगल ही सुविधा उपलब्ध करून देणार आहे. गुगलच्या My Business च्या प्रक्रियेचे व्हेरीफेकेशन झाल्यावर वापरकर्ते यात सहभागी होऊ शकतात. आपल्या व्यवसायाची माहिती, नवीन अपडेट्स ग्राहकांपर्यंत पोहचवणे आणि त्यांच्याशी संवाद साधने हे या फीचरचे मुख्य उद्दिष्ट आहे. यात ग्राहक त्यांना हव्या असलेल्या गोष्टींबाबत थेट व्यवसायकर्ते अथवा दुकानदार यांच्याशी संवाद साधू शकणार आहेत. त्यामुळे आता लहान व्यवसाय करणाऱ्यांना त्यांच्या व्यवसायाची वृद्धी करण्याची चांगली संधी आता उपलब्ध होणार आहे.

सध्या Android आणि IOS यांच्यासाठी गुगल मॅपचे मेसेज फिचर असेल. या महिन्यातील गुगल मॅपमध्ये होणारे पहिले अपडेट आहे. मॅपवर आलेला मेसेज स्वीकारण्यासाठी गुगल प्ले स्टोअरवर Google My Bussiness App इंस्टॉल करावे लागेल. अशी माहिती गुगलचे प्रोडक्ट मॅनेजर आदित्य तेंडुलकर यांनी दिली.