Lev Landau यांची 111 वी जयंती: Google ने Doodle बनवून केला सन्मान
Google honours physicist Lev Landau on his 111th birth anniversary | (Photo Credits: Google)

जगप्रसिद्ध वैज्ञानिक लेव लँडो (Lev Landau ) यांची आज (मंगळवार, 22 जानेवारी) 111 वी जयंती. इंटरनेट विश्वातील सर्वात मोठे सर्च इंजिन Google ने डूडल (doodle) बनवून लँडो यांची आठवण आपल्या खास शैलीत जागवली आहे. लेव लँडो हे 20 व्या शतकातील एक महत्त्वपूर्ण संशोधक होते. त्यांनी भौतिकशास्त्रात विशेष संशोधन केले. 1908 मध्ये अजरबैजान येथे जन्मलेले लँडो हे लहानपनापासूनच एक धडपडी व्यक्तिमत्व होते.

वयाच्या 13 व्या वर्षीच लँडो यांनी आपल्या सहकाऱ्यांच्या (विद्यार्थी) कितीतरी आगोदर कॉलेजमध्ये प्रवेश घेतला. त्यांना शाळा, कॉलेजमध्ये अत्यंत शांत मुलगा म्हणून ओळखले जात असे. त्यांचे वडील एका तेल कंपनीत अभियंता (इंजिनिअर) होते. तर त्यांची आई डॉक्टर. लेव लँडो यांनी 1942मध्ये लेनिनग्राद विद्यापिठात भोतिकशास्त्र शिकण्यासाठी प्रवेश घेतला. इथेच त्यांनी पहिला शोधनिबंध द थेरी ऑफ द स्पेक्ट्रा ऑफ डायटॉमिक सादर केला. हा शोधनिबंध सादर केले तेव्हा ते केवळ 18 वर्षांचे होते. पीएचडी पूर्ण केल्यनंतर त्यांनी वयाच्या 21व्या वर्षी रॉकफेलर फेलोशिप (Rockefeller Fellowship ) आणि सोव्हियत वजीफासाठी अर्ज केले. पुढे त्यांना झुरिच (Zurich), केंब्रिज ( Cambridge), कोपेनहेगन (Copenhagen) येथे संशोधन करण्याची संधी मिळाली. इथे त्यांना नोबेल पुरस्कार विजेते नील्स बोहर (Niels Bohr) यांच्यासोबत संशोधन करण्याची संधी मिळाली. त्यांनी मांडलेली क्वांटम थेरी (quantum theory) विशेष गाजली. (हेही वाचा, Google Doodle : कर्णबधीरांचे पितामह Charles-Michel de l'Épée यांना गुगलची आदरांजली)

1 एप्रिल 1968 मध्ये लेव लँडो यांचा मृत्यू झाला. त्यांच्या पश्चात मास्को येथे लँडो इन्स्टिट्यूट फॉर थियोरेटिकल फिजिक्स (Landau Institute for Theoretical Physics in Moscow ) या संस्थेची स्थापना करण्यात आली.