COVID-19 चा प्रार्दुभाव रोखण्यासाठी Google Assistant वारंवार करुन देणार स्वच्छ हात धुण्याची आठवण, त्यासाठी वापरा 'या' सोप्या टिप्स
Google Assistant (Photo Credits: Wikimedia Commons Pixabay)

कोरोना व्हायरसचा प्रार्दुभाव रोखण्यासाठी सर्व शासकीय यंत्रणा आपापल्या परीन सर्वोतोपरी प्रयत्न करत आहेत. त्यासोबत कला, शिक्षण, मनोरंजन क्षेत्रातील मातब्बर व्यक्ती देखील सोशल मिडियाच्या माध्यमातून स्वच्छ हात धुण्याचा, घराबाहेर न पडण्याचा सल्ला देत आहे. कोरोना व्हायरसपासून स्वत:चा बचाव करण्यासाठी वारंवार स्वच्छ हात धुणे हा एकमेव उपाय आहे. मात्र कधी कधी अनेकांच्या हे ध्यानात राहत नाही. म्हणून गुगल असिस्टंटही तुमची या कामात मदत करणार आहे. ठराविक वेळानंतर सतत हात धुण्यासाठी तुम्हाला गुगल असिस्टंट मदत करणार असून तुम्ही त्यावर Reminder ही सेट करु शकतात.

यासाठी तुम्हाला गुगल असिस्टंटवर काही ठराविक सेटिंग्स करावी लागेल.या रिमांयडर सोबत गुगल असिस्टंर तुम्हाला एका गाण्याच्या माध्यामातून हात कसे धुवायचे आणि हात धुण्याचे महत्वही सांगणार आहे.

Google Assistant वर रिमांयडर सेट करण्यासाठी काय कराल?

1. जर तुम्ही गुगल असिस्टंटवर 'Set a reminder to wash hands' पर्याय निवडल्यावर तुम्हाला तिथे किती वेळा रिमांयडर हवा आहे यासाठी पर्याय दिसतील.

2. त्यावर तुम्हाला हवी ती वेळ निवडून तुम्हाला त्या त्या वेळेस गुगल असिस्ंटट हात धुण्याची आठवण करुन देईल. लॉक डाऊनच्या काळात WhatsApp, TikTok ला मागे टाकून 'हे' App ठरले सर्वात लोकप्रिय; 500 दशलक्षपेक्षा जास्त लोकांनी केले डाउनलोड

3. त्याचबरोबर 'Help me wash my hands' असे गुगल असिस्टंटला सांगितल्यावर तुम्हाला हँडवॉशवर एक गाणे ऐकवले जाईल. जे तुम्हाला हात धुण्याचे महत्वही सांगेल.

अशा गंभीर परिस्थितीत आपण सर्वात जास्त काळजी घेतो ती आपल्या घरातील लहान मुलांची. त्यामुळे त्यांना आवडत्या अशा टेक्नोलॉजी च्याच माध्यमातून आपण त्यांना मजेशीर रित्या हात धुण्याचे महत्व पटवून देऊ शकता.