
कोरोना विषाणूच्या (Coronavirus) पार्श्वभूमीवर सध्या संपूर्ण देशात लॉक डाउन (Lockdown) आहे. अशावेळी लोक सोशल मीडियावर खूप सक्रिय झाले आहेत. या काळात जवळजवळ सर्वजणच घरी असल्याने एकमेकांशी संपर्कात राहण्यासाठी वेगवेगळे पर्याय शोधले जात आहेत. यात झूम (Zoom) नावाचे App इतके लोकप्रिय झाले आहे की, या काळात ते भारतातील सर्वात जास्त डाउनलोड केलेले App ठरले आहे. या बाबतीत झूमने लोकप्रिय अशा व्हॉट्सअॅप, टिकटॉक आणि इंस्टाग्रामलाही मागे टाकले आहे. सध्या लोकांना घरातून बाहेर पडण्याची परवानगी नसल्याने लोक झूम नावाच्या व्हिडिओ कॉलींग App द्वारे एकमेकांच्या संपर्कात राहत आहेत.
सिलिकॉन व्हॅली येथील स्टार्टअप कंपनीने बनविलेले हे अॅप व्हिडीओ कॉन्फरन्सिंग अॅप आहे, ज्यात एकावेळी 50 लोक जोडले जाऊ शकतात. झूम हे असे एकमेव अॅप आहे ज्यात व्हिडिओ कॉन्फरन्स दरम्यान 10 पेक्षा जास्त लोकांना एकाच वेळी जोडले जाऊ शकते. याच कारणामुळे घरून काम करणाऱ्या व्यावसायिकांमध्ये अॅप अवघ्या काही दिवसांत लोकप्रिय झाले. आतापर्यंत 500 दशलक्ष लोकांनी हे अॅप डाउनलोड केले आहे आणि अजूनही ही संख्या वाढत आहे. (हेही वाचा: लॉकडाऊनच्या काळात Airtel कडून 8 कोटी ग्राहकांना मोठी भेट; वाढवली प्रीपेड योजनेची वैधता व मिळणार मोफत टॉकटाईम)
कामाशिवाय वैयक्तिक कॉलसाठी देखील या App चा वापर वाढला आहे. म्हणूनच झूम App बनवणारी कंपनी अशा लोकांमधील एक असेल ज्यांना कोरोना व्हायरस महामारीमुळे चांगलाच फायदा झाला. या शर्यतीमध्ये लॉकडाऊन दरम्यान व्हॉट्सअॅप पाचव्या क्रमांकावर घसरला आहे. झूम अॅपच्या विनामूल्य आवृत्तीमध्ये, 100 लोकांना कॉलमध्ये जोडले जाऊ शकते यासह, अॅपमध्ये वन ऑन वन मिटिंग, तसेच 40 मिनिटांचे ग्रुप कॉलिंग देखील देण्यात आले आहे.