layoff Pixabay

Google, Amazon, Snap, Microsoft सह अनेक मोठ्या टेक कंपन्यांकडून layoffs जाहीर करण्यात आले आहे. 2023 च्या तिसर्‍या आणि चौथ्या क्वार्टर मध्ये ही नोकरकपात कायम आहे. कंपन्या सणासुदीच्य काळात प्रॉफिट्स जाहीर करतात पण सध्या अनेक कंपन्या नव्याने पुन्हा नोकरकपात जाहीर करत आहेत. रिपोर्ट्स नुसार सध्या जगात 2.4 ते 2.5 लाख कर्मचार्‍यांना कामावरून हटवण्यात आले आहे. टेक आणि गेमिंग़ क्षेत्रामध्ये सुरू असलेली ही नोकरकपात अजूनही सुरूच आहे. नुकतेच Google, Microsoft, Wells Fargo, Splunk, Pfizer, Viasat, F5 ने त्यांच्या टेक आणि गेमिंग भागातून नोकरकपात केली आहे. अमेझॉण मध्ये म्युझिक आणि गेमिंग भागातून कर्मचारी कमी केले आहेत. Bill Gates On AI: भविष्यातील चित्र बदलणार, 5 वर्षांत प्रत्येक इंटरनेट वापरकर्त्याकडे स्वतःचा रोबोट असेल; बिल गेट्स यांचा दावा .

2023 मध्ये कोणत्या कंपनीमध्ये कशी झाली नोकर कपात?

  • गूगल: गूगल मध्ये गूगल युजर्स, प्रोडक्ट्स अ‍ॅ न्ड कस्टमर सपोर्ट स्टाफ मधून नोकर कपात करण्यात आली आहे.
  • अमेझॉन: अमेझॉन मध्ये गेमिंग विभागात 180 नोकर्‍यांवर कुर्‍हाड पडली. ही नोकरकपात लेऑफच्या दुसर्‍या फेरीत झाली. यंदा या ई कॉमर्स च्या आघाडीच्या कंपनीने 27 हजार कर्मचार्‍यांना नारळ दिला.
  • स्नॅप: स्नॅपचॅटची पॅरेंट स्नॅप ने देखील 20% कर्मचारी प्रोडक्ट टीम मधून कमी केले. कंपनीची आर्थिक गणित बसवण्यासाठी ही नोकरकपात करण्यात आली आहे.
  • फायझर: आघाडीची अमेरिकन फार्मा कंपनी फायझर च्या यूके मधील कर्मचार्‍यांच्या नोकरीवर गदा आली आहे. 2023 वर्ष संपण्यापूर्वी देखील अजून काहींना नारळ मिळण्याची शक्यता आहे.
  • Wells Fargo: अमेरिकेतील मल्टिनॅशनल फायनॅन्शिअल सर्व्हिस कंपनी Wells Fargo कडून ले ऑफ करण्यात आले आहेत.
  • Splunk: अमेरिकन सॉफ्टवेअर कंपनी Splunk कडून जगभरातून 7% नोकर्‍यांवर गदा आली आहे.
  • Viasat:ग्लोबलटेलिकम्युनिकेशन कंपनी कडून 10% नोकरकपात झाली आहे. 800 जणांना नोकरीवरून काढून टाकले आहे.
  • F5: मल्टी क्लाऊड अ‍ॅप्लिकेशन F5 या ग्लोबल लीडर ने नोव्हेंबर 2023 मध्ये 120 जणांना नारळ दिला.

अहवालानुसार, Ubisoft, Virgin Galactic, Cruise, Pico, Chewy, OpenSpace, Starz, LinkedIn आणि इतर अनेक कंपन्यांनी 2023 मध्ये त्यांच्या कर्मचार्‍यांना मोठ्या प्रमाणात काढून टाकले आहे. टेक उद्योगातील नोकऱ्या कपातीमुळे काम करणार्‍या लाखो कर्मचार्‍यांवर परिणाम झाला आहे.

येत्या काही दिवसांत वर्ष संपण्यापूर्वी आणखी नोकरकपात होण्याची शक्यता उद्योग तज्ज्ञ आणि काही रिपोर्ट्स वर्तवत आहेत. tech layoffs चा डेटा, एचआर भरती आणि इतर सारख्या विभागांवर परिणाम झाला आहे.