Bill Gates On AI: भविष्यातील चित्र बदलणार, 5 वर्षांत प्रत्येक इंटरनेट वापरकर्त्याकडे स्वतःचा रोबोट असेल; बिल गेट्स यांचा दावा
Bill Gates (PC - facebook)

Bill Gates On AI: सध्या, AI सर्वांसाठी आकर्षण आहे. AI च्या संदर्भात भविष्याची सतत कल्पना केली जाते. अलीकडेच, मायक्रोसॉफ्टचे सह-संस्थापक बिल गेट्स (Bill Gates) यांनी AI बद्दल अनेक गोष्टी सांगितल्या आहेत. पाच वर्षांत AI सह भविष्य पूर्णपणे बदलून जाईल, असा त्यांचा विश्वास आहे. मायक्रोसॉफ्टचे सह-संस्थापक बिल गेट्स यांना विश्वास आहे की, लवकरच प्रत्येकाकडे स्वतःचा रोबोट असेल, जो वापरकर्त्याला अनेक कामांमध्ये मदत करेल. AI सह ते आजच्या तंत्रज्ञानापेक्षा खूप चांगले असेल.

आपला मुद्दा पुढे मांडताना बिल गेट्स म्हणाले की, एजंट हुशार असतात, कोणतेही काम मागण्यापूर्वीच सल्ला देण्याची क्षमता त्यांच्यात असते. भविष्यातील वैयक्तिक सहाय्यक सर्व प्रकारची कामे करण्यात पटाईत असतील. बिल गेट्सच्या म्हणण्यानुसार, ट्रिप प्लॅनिंगसाठी आज ट्रॅव्हल एजंटला पैसे द्यावे लागतात. तसेच, ट्रॅव्हल एजंटसोबत वेळ घालवण्याची गरज आहे. जेणेकरुन तो आम्हाला आमच्या आवडीनुसार भेट देण्याची ठिकाणे सांगू शकेल. (हेही वाचा - AI Talent in Demand: मार्केटमध्ये वाढत आहे ChatGPT-4 वर काम करणाऱ्या कर्मचाऱ्यांची मागणी; आर्टिफिशियल इंटेलिजन्समध्ये प्रतिभावान लोकांच्या शोधात असलेल्या कंपन्यांमध्ये Microsoft, Citigroup चा समावेश)

याउलट, AI आपल्या वापरकर्त्यांसाठी सहलींचे नियोजन करणे यासारखी कामेही उत्तम प्रकारे करेल. वापरकर्त्याच्या स्वारस्याच्या आधारावर, AI त्याला करण्याच्या गोष्टी सुचवेल. AI वापरकर्त्याला त्याच्या आवडीचे खाद्यपदार्थ आणि आरक्षणाच्या आधारे रेस्टॉरंटची माहिती देण्याचे काम करेल.

बिल गेट्सवर विश्वास ठेवला तर कंपन्या त्यांच्या कर्मचाऱ्यांना एजंटची सुविधा देऊ शकतील. अशा एआय एजंट्सना नियुक्त करण्यासाठी कंपन्या मोठ्या प्रमाणात पैसे भरतानाही दिसतील. असे एआय एजंट भविष्यात खूप महाग असतील. असे AI एजंट वापरकर्त्यांना त्यांच्या कार्यालयातच नव्हे तर सर्वत्र मदत करताना दिसतील.