मोबाईल हरवलाय? सहजपणे शोधता येणार, गुगलचे नवे फिचर
Find MY Device App ( फोटो सौजन्य - फाइल इमेज )

गुगल (Google) हे नेहमीच त्यांच्या युजर्ससाठी नव नवे फिचर्स घेऊन येत असतात. तर आता ही गुगले स्मार्टफोन हरविल्यास शोधण्यास मदत होईल असे नवीन फिचर त्यांच्या युजर्ससाठी आणले आहे.

गुगलने 'माय फाईंड डिवाईस'च्या (Find My Device) सेवेमध्ये अजून एक फिचर आणले आहे. Indoor Map असे या नव्या फिचरचे नाव आहे. या नव्या फीचरमुळे आता हरवेला स्मार्टफोन शोधण्यास मदत होणार आहे. तर घराबाहेरील दृश्ये दाखविणारी ठिकाणे या फिचरच्या माध्यमातून दाखविली जाणार आहेत. त्यामुळे युजर्स सहजपणे त्यांनी मोबाईल कुठे राहिला असल्याची माहिती मिळणार आहे.

(हेही वाचा : मोबाईलचे बिल कमी करण्यासाठी सोप्या '5' टिप्स !)

तर या नव्या फिचरमध्ये युजर्सना त्यांचे अंतिम ठिकाण, अलर्ट मॅसेज आणि मोबाईल स्क्रिन लॉक असताना मोबाईल नंबर पाहता येईल अशी सुविधा यामध्ये उपलब्ध करुन दिली आहे.