मोबाईलचे बिल कमी करण्यासाठी सोप्या '5' टिप्स !
प्रतिकात्मक फोटो (Photo Credit: Pixabay)

मोबाईलमध्ये आजकाल सर्व वयोगटातील माणसे व्यस्त असतात. स्वाभाविकच मोबाईलचा वापर वाढल्याने बिलही तसेच येते. पण अनेकदा गरजेपेक्षा अधिक बिल येते. हा अनुभव तुम्हीही घेतला असेल. चुकीचा प्लॅन निवडल्यामुळे बिल अधिक येऊ शकते. मोबाईलचे बिल अधिक येण्याची कारणे अनेक असली तरी काही गोष्टींकडे लक्ष दिल्यास मोबाईलचे बिल कमी येऊ शकते. म्हणून मोबाईलचे बिल कमी करण्यासाठी 'या' काही गोष्टी फायदेशीर ठरतील.

तुमच्या गरजेनुसार करा प्लॅनची निवड

अनेकदा युजर्स आपल्या गरजेपेक्षा अधिक महागड्या प्लॅन्सची निवड करतात. त्यामुळे मोबाईलचे मासिक बिल अधिक येते. पण प्रत्येक युजरची गरज वेगवेगळी असते. कोणाला डेटा अधिक हवा असतो तर कुणाला कॉल अधिक करायचे असतात. अशावेळी तुमच्या गरजेचेनुसार, वापरानुसार प्लॅनची निवड करा. त्यामुळे तुम्हाला नक्कीच फायदा होईल.

दुसऱ्या ऑपरेटर्सच्या प्लॅन्ससोबत तुलना करा

ज्याप्रकारे तुम्ही तुमच्या गरजेनुसार प्लॅनची निवड करता. त्याचप्रमाणे तुमच्यासाठी बेस्ट असलेल्या कंपनीची निवड करा. उदा. तुम्हाला डेटा अधिक हवा आहे आणि तीन कंपन्या तुम्हाला डेटा प्लॅन ऑफर करत आहेत. तर त्या तिघांची तुलना करा. कोणता प्लॅन अधिक स्वस्त आहे, त्यानुसार निवड करा. त्यामुळे तुमचे मासिक बिल कमी होण्यास नक्कीच मदत होईल.

डेटासाठी वायफाय वापरा

तुमच्या प्लॅन्समध्ये कॉल्सचे बेनिफिट्स अधिक आणि डेटा कमी मिळत असल्यास वाय फायचा वापर करणे योग्य ठरेल. अशावेळी पब्लिक वाय फाय वापरणे फायदेशीर ठरेल आणि डेटामुळे येणारे अतिरिक्त बिल कमी होण्यास मदत होईल.

इंटरनॅशलन कॉलसाठी वापरा OTT अॅप्स

फेसबुक मेसेंजर, व्हॉट्सअॅप इत्यादी मध्ये तुम्हाला डेटा बेस्ड कॉलिंगचा पर्याय उपलब्ध आहे. अशावेळी इंटरनॅशलन कॉल्ससाठी या अॅप्सचा वापर करा. यावरुन तुम्ही ऑडिओ, व्हिडिओ कॉल्सचा पर्याय निवडू शकता. त्यामुळे तुमचे बिल खूप कमी होण्यास मदत होईल.

प्रीपेडचा पर्याय

तुम्हाला हवा तसा प्लॅन बाजारात उपलब्ध नसल्यास तुम्ही प्रीपेडमध्ये स्वीच करु शकता. आजकाल अनेक टेलिकॉम कंपन्या फ्री डेटा, कमी कॉलिंग रेट अशा अनेक सुविधा देत आहे. अशावेळी तुम्ही प्रीपेडमध्ये स्वीच झालात तर बिलाची रक्कम नक्कीच कमी होईल.