Gmail, YouTube Down Globally: गुगल वरील Gmail आणि YouTube सर्विस युजर्सला वापरण्यास जगभरातून समस्या येत आहे. याबद्दल युजर्सकडून सोशल मीडियावरील ट्विटरवर तक्रार करण्यात आली आहे. त्यांनी असे म्हटले आहे की, गुगल चॅट, हँगआउटसह अन्य सर्विस ज्या जी-मेलच्या माध्यमातून वापरल्या जातात त्यासाठी समस्या उद्भवत आहेत.(Social Media Apps: Facebook ला मागे टाकून TikTok बनले सर्वाधिक डाउनलोड केले गेलेले अॅप; लोकांनी Tinder वर व्यतीत केला सर्वाधिक वेळ)
जी-मेल ची सुविधा ठप्प झाल्याने प्रोफेशनल कामासह, गुगल चॅट आणि जीमेल वापरकर्त्यांना सद्यच्या घडीला माहिती किंवा एखादी फाइल शेअर करण्यासाठी समस्या येत आहे. कोरोना व्हायरच्या काळात या सारख्या सुविधांचा मोठ्या प्रमाणात वापर केला जात आहे. खासकरुन घरुन काम करणाऱ्या कर्मचाऱ्यांसाठी जीमेलसह अन्य सर्विसचा नेहमीच वापर केला जातो.(2020 Most Tweeted Emojis: नेटकर्यांनी ट्वीटरवर वर्षभरात सर्वाधिक वापरलेल्या इमोजींची यादी प्रसिद्ध; Tears of Joy ते Praying पर्यंत पहा टॉप 5 Emojis)
Tweet:
"Something went wrong..."
Some users in the Philippines report trouble accessing YouTube and Google Mail on Monday evening. #youtubedown #gmaildown
Are you experiencing this issue as well? pic.twitter.com/UsEZR4ovkO
— ABS-CBN News (@ABSCBNNews) December 14, 2020
दरम्यान, युजर्सकडून यासंदर्भात जोक्स आणि उपहासात्मक पोस्ट करण्यात आल्या आहेत. तर जी-मेल, युट्युब सारख्या प्लॅटफॉर्मचा युजर्सकडून मोठ्या प्रमाणात दररोज वापर केला जातो.