2020 Most Tweeted Emojis: नेटकर्‍यांनी ट्वीटरवर वर्षभरात सर्वाधिक वापरलेल्या इमोजींची यादी प्रसिद्ध; Tears of Joy ते Praying पर्यंत पहा टॉप 5 Emojis
2020 most tweeted emojis (Photo Credits: Twitter India)

2020 हे वर्ष अनेकांसाठी चढउतारांचं राहिलं आहे. या वर्षभरात अनेक गोष्टी झाल्या. दरम्यान ट्वीटर कडून देखील सध्या मागील 12 महिन्यांचा आढावा घेतला जात आहे. 2020 या वर्षाला यंदा अलविदा म्हणण्यापूर्वी #ThisHappened च्या सीरीजमध्ये काही जुन्या गोष्टींना उजाळा दिला जात आहे. यामध्ये मागील वर्षभरात नेटकर्‍यांनी ट्वीटर वर वापरलेल्या 5 सर्वाधिक वापरलेल्या इमोजींची यादी देखील प्रसिद्ध करण्यात आली आहे. क्रोनोलॉजिकल ऑर्डर मध्ये या 5 इमोजी ट्वीटरने प्रसिद्ध केल्या आहेत. #ThisHappened च्या सीरीजमध्ये ट्वीटर कडून 2020 Most Retweeted Tweet in India, 2020 Most Liked Tweet in India, 2020 Quoted Tweet in India यांचा समावेश आहे. Twitter’s 2020 recap: तमिळ अभिनेता विजय याचा सेल्फी ते विरुष्काच्या प्रेग्रंसी बद्दल फोटोच्या बातम्यांचा ट्विटरवर टॉप ट्रेन्ड.  

2020 Most Tweeted Emojis ची यादी प्रसिद्ध करताना त्यामध्ये सर्वाधिक वापरलेल्या इमोजीमध्ये आनंदाश्रू वाहणारे, नमस्कार करणारे हात, हार्ट शेप्ड आईज, थम्स अप आणि रडणारा चेहरा या इमॉटिकॉन्सची वर्णी लागली आहे. या बद्दल लिहताना ट्वीटर इंडिया काय म्हणतंय हे तुम्हीच बघा.

ट्वीटर इंडिया

आजच्या आधुनिक युगात सोशल मीडियाचा वापर करणारी अनेक मंडळी शब्दांपेक्षा इमॉटिकॉन्सचा वापर करून आपल्या मनातील भावना व्यक्त करण्याला पसंती देतात. 1990 च्या काळात इमोजीस आल्या असल्या तरीही त्याचा वापर 2015 नंतर झपाट्याने वाढलेला पहायला मिळाला आहे.

जगाच्या कानाकोपर्‍यात कुठेही घडलेली एखादी लहानशी घटना देखील आज सोशल मीडीयामुळे सहज जगभर पोहचते. यामध्ये लोकं आपल्या मनातील भावना, प्रतिक्रिया व्यक्त करत असतात.