Twitter (Photo Credits: IANS)

Twitter’s 2020 recap:  2020 हे वर्ष संपण्यासाठी अवघे काही दिवसच शिल्लक राहिले आहेत. परंतु ट्विटरवर यंदाच्या वर्षात टॉप ट्रेन्ड ते ट्वीट्स आणि विविध विषय हे फारच चर्चेत राहिले आहेत. भारतात ट्विटरवर 2020 मध्ये सर्वाधिक रिट्वीट करण्यात आलेल्या व्यक्तींमध्ये तमिळ अभिनेता विजय याचा चाहत्यांसोबतचा सेल्फी फोटो खुपच व्हायरल झाला होता. त्याचसोबत सर्वाधिक लाईक्स मिळालेल्या ट्विटमध्ये भारतीय क्रिकेटर विराट कोहली आणि त्याची पत्नी, अभिनेत्री अनुष्का शर्मा हिच्या प्रग्नेंसी बद्दलच्या बातम्यांसह फोटोंचा यामध्ये समावेश आहे. याच दरम्यान, 2020 मध्ये ट्विटरवरील टॉप हॅशटॅगमध्ये #COVID19 हा ठरला असून त्याने सर्वांना एक धक्काच दिला. त्याचसोबत #SushantSinghRajput आणि #Hathras हे हॅशटॅग ही ट्विटरवर ट्रेन्डिंग मध्ये असल्याचे दिसून आले होते. या दोन्ही घटनांमुळे सर्वांच्या पायच्या खालची जमीन सरकली होती.

खेळासाठी #IPL2020 हा सर्वाधिक ट्रेन्डिंगमध्ये असलेला हॅशटॅग ठरला आहे. त्याचसोबत सुशांत सिंह राजपूत याच्या मृत्यूनंतर त्याचा आगामी चित्रपट #DilBechara प्रदर्शित करण्यात आला. त्यानंतर या चित्रपटाचा हॅशटॅग ही ट्विटरवर खुप ट्रेन्डिंग होता. या व्यतिरिक्त #Binod नावाचा एक ट्रेन्ड आला होता. यावर लोकांनी तुफान मेम्स आणि जोक्स तयार करत ते शेअर केले होते.

यंदाच्या वर्षात ट्विटवर कोरोना व्हायरसच्या विरोधात जागतिक पातळीवर लढा, उत्सावात पुन्हा एकदा सहभागी होणे आणि ज्या समाजावर कोरोनाचा परिणाम झाला आहे त्याबद्दल अधिक चर्चा करण्यात आली. तसेच मेम्सचा ही ट्विटरवर पाऊस पडल्याचे दिसून आले. ट्विटर इंडियाचे मॅनेजिंग डिरेक्टर मनिष माहेश्वरी यांनी एका प्रेस नोटमध्ये ही गोष्ट सांगितली आहे. तर 2020 मध्ये ट्विटवरील हायलाईट्स येथे पहा (नव्या वर्षात बदलणार Mobile वर कॉलिंग करण्याची पद्धत, नंबर Dial करण्यापूर्वी लावावा लागणार '0')

अभिनेता विजय याचा चाहत्यांसोबतचा फोटो सर्वाधिक रिट्विट म्हणजेच 145000 वेळा करण्यात आला आहे. येथे पहा ट्विट:

Tweet:

विराट कोहली आणि अनुष्का शर्मा या दोघांनी त्यांच्या प्रेग्नसींबद्दल गोड बातमी दिली. त्यांच्या या गोड बातमीच्या पोस्टला 645,000 लाईक्स मिळाले आहेत.

Tweet:

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी कोरोनाच्या विरोधात दिवे लावण्याच्या आवाहनाला ही नागरिकांकडून मोठ्या प्रमाणात प्रतिसाद दिला गेला. मोदी यांच्या या ट्विटला 100,000 रिट्विट करण्यात आले.

Tweet:

त्याचसोबत महेंद्र सिंह धोनी याने पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या पत्राचे ही कौतुक केले होते. धोनी याचे हे ट्विट सर्वाधिक वेळा रिट्विट करण्यात आले आहे. मोदी यांनी त्यांच्या पत्रात धोनी याच्या भारतीय संघातील योगदानासाचे कौतुक केले होते. धोनी याने आपण खेळातून निवृत्ती घेत असल्याचे याच वर्षात जाहीर केले होते.

Tweet:

उद्योगधंद्याच्या क्षेत्रामध्ये प्रसिद्ध उद्योगपती रतन टाटा यांनी कोविड19 मुळे फटका बसलेल्यांना पाठिंबा देण्याचा निर्णय घेतला होता. रतन टाटा यांनी त्यांच्यासाठी कंपनीकडून 500 कोटी रुपये दान केले होते. रतन टाटा यांच्या या ट्विटला 50,000 रिट्विट करण्यात आले.

Tweet:

त्याचसोबत अभिनेते अमिताभ बच्चन यांनी त्यांना कोरोनाची लागण झाल्याची माहिती ट्विट करत दिली होती. अमिताभ बच्चन यांनी त्यांच्या संपर्कात आलेल्यांना काळजी घेण्याचे आवाहन त्यांच्या या ट्विट मध्ये केले होते.

Tweet:

तर ट्विटरवर कोरोनाच्या परिस्थितीत नागरिक घरात अडकून पडल्याने त्यांनी विविध गोष्टींबद्दल ट्विट केले. तसेच युजर्सकडून कोरोनाच्या काळात घडलेल्या गोष्टींबद्दल सर्वाधिक ट्विट आणि रिट्विट्स केले. यामध्ये सुशांत सिंह राजपूत याची आत्महत्या, कोरोना व्हायरस, आयपीएल, स्टे होम स्टे सेफ, वेअरमास्क, डब्लूएचओ, हाथरस सारखे हॅशटॅग ट्विटरवर ट्रेन्ड केल्याचे दिसून आले आहे.