Tik Tok (Photo Credits-Gettey Images)

सोशल मीडिया अॅप्समध्ये (Social Media Apps) बर्‍याचदा त्यांच्या पातळीवर स्पर्धा होत असते. कोरोना कालावधीत लोकांनी अ‍ॅप्सचा अधिक वापर करण्यास सुरवात केल्यानंतर तर हा संघर्ष अजूनच वाढला. आता 2020 मध्ये कोणते अ‍ॅप लोकांनी सर्वाधिक डाउनलोड केले याबद्दलही बातम्या समोर आल्या आहेत. भलेही भारतामध्ये टिक टॉकवर (TikTok) बंदी घातली गेली असेल, परंतु या चिनी अॅपने एक नवीन विक्रम आपल्या नावे केला आहे. 2020 मध्ये टिक टॉक हे फेसबुक (Facebook) अॅपपेक्षा जास्त डाऊनलोड झाले आहे. अ‍ॅप अ‍ॅनी (App Annie) या विश्लेषक कंपनीने हा अहवाल जाहीर केला आहे.

या यादीमध्ये पहिल्या 5 अॅप्सविषयी माहिती देण्यात आली आहे, ज्यात टिकटॉक पहिल्या क्रमांकावर, दुसर्‍या क्रमांकावर फेसबुक, तिसर्‍या क्रमांकावर व्हॉट्सअॅप, चौथ्या क्रमांकावर झूम आणि पाचव्या क्रमांकावर इन्स्टाग्राम आहे. त्यानंतर गुगलचे गुगल मीट अॅप सातव्या क्रमांकावर आहे. पुढे स्नॅपचॅट, टेलिग्राम आणि लाइकीचा क्रमांक लागतो. हा डेटा जानेवारी ते नोव्हेंबर 2020 दरम्यान डाउनलोड केलेल्या अ‍ॅप्सचा आहे.

हा डेटा Google Play Store आणि iOS अ‍ॅप स्टोअरवरून डाउनलोड केलेल्या अ‍ॅप्सचा आहे. अ‍ॅप अ‍ॅनीच्या म्हणण्यानुसार कोरोना विषाणूच्या साथीमुळे मोबाईलचा वापर आधीपेक्षा खूप वाढला आहे. अहवालानुसार लोक आता मोबाईलवर पूर्वीपेक्षा जास्त वेळ घालवत आहेत आणि यादरम्यान व्यवसाय अॅप प्रकारातही मोठी वाढ झाली आहे. उदाहरणार्थ, झूम अॅपने 200% वाढ केली आहे. या अहवालात असेही म्हटले आहे की आयओएस आणि गुगल प्लेवर लोकांच्या वेळेचा कल 25% वाढला आहे. फक्त इतकेच नाही तर गेल्या काही वर्षांच्या तुलनेत या वेळी अशा प्रकारच्या अ‍ॅप खरेदीमध्येही वाढ झाली आहे.

विशेष म्हणजे, डेटिंग अ‍ॅप टिंडरवर लोकांनी सर्वाधिक वेळ घालवला आहे. ग्राहकांच्या ट्रेंडमध्ये हे अॅप नंबर 1 आहे. गेमिंग अॅप फ्री फायर यावर्षी सर्वाधिक डाउनलोड केलेला गेम झाला आहे. पबजी मोबाईलचा नंबर चौथा आहे. अ‍ॅप अ‍ॅनीने आपल्या अहवालात असेही म्हटले आहे की, 2021 मध्ये टिकटॅकचे मासिक सक्रिय वापरकर्ते 1 अब्जचा आकडा ओलांडतील. (हेही वाचा: WhatsApp Carts Feature मुळे आता व्हॉट्सअ‍ॅप वर शॉपिंगचा अनुभव होणार अधिक सुकर; पहा कसं वापराल हे फीचर)

महिन्यातील अ‍ॅक्टिव्ह यूझर्सबद्दल बोलायचे झाले तर, फेसबुक अव्वल क्रमांकावर आहे, मग व्हॉट्सअ‍ॅप, फेसबुक मेसेंजर आणि इन्स्टाग्रामचा नंबर लागतो. या यादीमध्ये Amazon पाचव्या क्रमांकावर आहे.