भारतासह युरोपीय देशांमध्ये Gmail सेवा ठप्प, 'Error 404' दाखवत असल्याच्या युजर्सच्या ऑनलाईन तक्रारी
Gmail Down (Photo Credits: Twitter)

Gmail Down: अग्रगण्य सर्च इंजिन गूगलची (Google)  जीमेल (Gmail)  सेवा भारतासह (India) युरोपातील (Europe) काही देशांमध्ये ठप्प असल्याची तक्रार युजर्सनी ऑनलाईन माध्यमातून केली आहे. "Error 404" अशा प्रकारचा मेसेज दाखवत असल्याची तक्रार स्क्रीनशॉर्ट सकट युजर्सनी केली आहे. Downdetector.com ने दिलेल्या माहितीनुसार, अनेकांना जीमेल वापरता येत नाही आहे. मंगळवारी भारतीय वेळेनुसार संध्याकाळी 4.46 मिनिटांपासून तर युरोपीयन वेळेनुसार सकाळी 6.16 मिनिटांपासून युजर्सना हा एरर मिळत आहे.

गूगल कडून अद्याप कोणतीही अधिकृत माहिती देण्यात आलेली नाही. मात्र Downdetector.comने दिलेल्या माहितीनुसार, 42% युजर्सना लॉग ईन करताना, 31% लोकांना ईमेल , मेसेज मिळण्यासाठी तर 25% युजर्सना वेबसाईट ओपन करताना अडथळा येत आहे.  नक्की वाचा:  गूगलच्या नावापासून त्याच्या संस्थापकांबाबतच्या काही इंटरेस्टिंग गोष्टी

युजर्सच्या प्रतिक्रिया

 

जीमेलमध्ये अडथळा येत असला तरीही युट्युव, गूगल न्यूज या गूगलच्या अन्य सेवा सुरळीत सुरू आहेत. काही महिन्यांपूर्वी इंस्टाग्राम ,व्हॉट्सअ‍ॅप देखील अशाप्रकारेच अचानक ठप्प झाली होती. त्यामुळे जगभरातील युजर्सचे नुकसान झाले होते.