Gleeden (Photo Credits: IANS)

विवाहबाह्य संबंध ठेवण्यासाठी असलेले डेटिंग अॅप ग्लीडेन यांनी मंगळवारी एक डेटा शेअर केला आहे. त्यानुसार कोरोनाच्या काळात भारतीय युजर्सने या अॅपवर 13 लाखांचा टप्पा पार केल्याचे  समोर आले आहे. ग्लीडेन अॅपच्या सब्सक्रिप्शनमध्ये ही गेल्या तीन महिन्यात तुफान वाढ झाली आहे. तर सप्टेंबर, ऑक्टोंबर आणि नोव्हेंबर मध्ये भारतात जवळजवळ 246 टक्क्यांनी वाढ झाली आहे. जी जुन, जुलै आणि ऑगस्टपेक्षा ही अधिक आहे. कंपनीच्या मते, गेल्या चार महिन्यांत त्यांचे तीन लाख सब्सक्रायबर्स झाले आहेत. त्यापैकी 2.5 लाख युजर्सची गेल्या दोन महिन्यात भर पडली आहे.

वेबसाइटवर वेळ घालवण्याचे प्रमाण हे 2019 पासून तिप्पट पटीने वाढले आहे. तर कोरोनाचे संक्रमण होईल या भितीसह जेव्हा लॉकडाऊनचे नियम हळूहळू शिथिल केल्यानंतर लोकांनी प्रत्यक्षात भेटण्याऐवजी वर्च्युअली भेटणे पसंद केले आहे. आमच्या या डेटिंग प्लॅटफॉर्मला देशातून मान्यता मिळाल्याचे ग्लीडेन इंडियााचे Sybil Shiddell यांनी म्हटले आहे.(Social Media Apps: Facebook ला मागे टाकून TikTok बनले सर्वाधिक डाउनलोड केले गेलेले अॅप; लोकांनी Tinder वर व्यतीत केला सर्वाधिक वेळ)

या प्लॅटफॉर्मवर Tier1 शहरांसोबत बंगळुरुतच ग्लीडनचे एकूण 16.2 टक्के युजर्स आहेत. तर मार्च 2020 पासून आणखी नव्या युजर्सची भर पडली असून त्यात 17 टक्क्यांनी ही वाढ झाली आहे. तर मुंबईत 15.6 टक्के ग्लीडन युजर्स असून त्यांचा ग्रोथ रेट 14 टक्के आहे. तर दिल्ली तिसऱ्या स्थानावर असून 15.4 टक्के भारतीय युजर्स असून त्यांचा ग्राथ रेट 25 टक्के आहे.(Facebook ने दिवाळीच्या पार्श्वभुमीवर लॉन्च केले अत्यंत दमदार फिचर्स, मित्रमंडळींना शुभेच्छा देण्यासह मिळणार धमाकेदार Challenge)

ग्लीडेन यांनी असे ही म्हटले की, युरोपियन नागरिकांपेक्षा भारतीय हे जवळजवळ यावर 3.5 तास घालवतात.(मार्च 2020 ते नोव्हेंबर) तर कपल्समध्ये भेटण्याची वेळ ही विकेंड, गर्दीचा वेळ जरी असली तरीही ते आठवडाभरात भेटतात. तर रात्री 10 ते 12 वाजेपर्यंतचा काहींचा भेटण्याचा ही वेळ आहे. मात्र पुरुष युजर्सकडून या अॅपचा वापर लॉकडाऊनच्या आधीपासूनच केला जात असल्याने 45 टक्के उत्पन्नात वाढ झाली आहे.