Flipkart Big Saving Days सेल आज रात्री 12 वाजल्यापासून होणार सुरु, 'या' स्मार्टफोनवर मिळणार धमाकेदार सूट
Flipkart (Photo Credits: File Photo)

जर तुम्हाला स्वस्तात स्मार्टफोन किंवा एखादे इलेक्ट्रॉनिक गॅजेट खरेदी करयाचे असेल तर तुमच्याकडे उत्तम संधी आहे. कारण आज रात्री 12 वाजल्यापासून फ्लिपकार्टच्या Big Saving Days सेलला सुरुवात होणार आहे. हा सेल येत्या 8 ऑगस्ट पर्यंत ग्राहकांसाठी उपलब्ध असणार आहे. या सेलमध्ये कंपनी खासकरुन स्मार्टफोनवर उत्तम डिल्स देणार आहे. नेहमीप्रमाणे फ्लिपकार्ट आपल्या सेलमध्ये Axis, ICICI बँकेच्या क्रेडिट कार्ड ग्राहकांसाठी 10 टक्के इंस्टंट डिस्काउंट सारखे ऑफर देत आहे. या व्यतिरिक्त युजर्सला नो कॉस्ट EMI, एक्सजेंच ऑफरचा सुद्धा फायदा घेता येणार आहे.

फ्लिपकार्टच्या सेलदरम्यान मोटोरोला रेजरवर उत्तम ऑफर मिळणार आहे. हा फोल्डेबल स्मार्टफोन सेलवेळी 54,999 रुपयांना ग्राहकांना खरेदी करता येणार आहे. गेल्या वर्षात हा स्मार्टफोन लॉन्च करण्यात आला होता. त्यावेळी त्याची किंमत 1,24,999 रुपये ठेवण्यात आली होती. ज्यावर आता सेलमध्ये जवळजवळ 70 हजार रुपयांची सूट दिली जाणार आहे.(Mobile Exchange Offers: जुना मोबाईलच्या बदल्यात 'ही' कंपनी देतेय नवा स्मार्टफोन, जाणून घ्या कधीपासून होतेय सेलला सुरूवात)

तसेच iPhoen SE (2020) आणि iPhone XR वर सुद्धा दमदार डिल्स मिळणार आहे.आयफोन एसई (2020) स्मार्टफोन ग्राहकांना 32,999 रुपयांना खरेदी करता येणार आहे. तसेच आयफोन एक्सआर 47,900 रुपयांऐवजी 38,999 रुपयांना उपलब्ध होणार आहे.(Amazon Alexa आता तुमच्या जवळचं COVID-19 Vaccination Centres शोधायला करणार मदत; जाणून घ्या कसं?)

या व्यतिरिक्त सेल वेळी शाओमीच्या Mi 10T सीरिजची किंमत 24,499 रुपयांपासून सुरु होणार आहे. ज्यामध्ये एक्सजेंच आणि बँक ऑफरचा समावेश आहे. त्याचा अर्थ असा होतो की, जवळजवळ 8,500 रुपयांची सूट मिळणार आहे. Mi10 T भारतात 32,999 रुपयांना तर Mi 10T Pro हा फोन 36,999 रुपयांना विक्री केला जात आहे.