Mobile Exchange Offers: जुना मोबाईलच्या बदल्यात 'ही' कंपनी देतेय नवा स्मार्टफोन, जाणून घ्या कधीपासून होतेय सेलला सुरूवात
Redmi (Photo Credits-Twitter)

जर तुम्हाला तुमचा जुना मोबाईल (Mobile) विकून नवीन मोबाईल घ्यायचा असेल तर शाओमी (Xiaomi) तुम्हाला एक उत्तम ऑफर (Offer) देत आहे. ज्यात तुम्ही तुमचा जुना फोन एक्सचेंज (Mobile Exchange) करू शकता आणि नवीन स्मार्टफोन घेऊ शकता. कंपनीने 2 ऑगस्टपासून एक्सचेंज डेज सेल (Exchange Days Sale) सुरू केली आहे. ज्यामध्ये सर्व स्मार्टफोनवर (Smartphones) बंपर डिस्काउंट दिले जात आहेत. यासोबतच कंपनी 15,000 रुपयांची एक्सचेंज ऑफर देखील देत आहे. याचा अर्थ असा की तुम्ही तुमचा जुना फोन देऊन बंपर सवलतींचा लाभ घेऊ शकता. या ऑफर अंतर्गत, तुम्ही Mi 11X 5G, Mi 11X Pro, Mi 10i, Redmi Note 10 Pro, Redmi Note 10 Pro Max, Redmi Note 10S, Mi 10T आणि Mi 10T Pro सारख्या शाओमी स्मार्टफोनवर सवलत आणि एक्सचेंज ऑफरचा लाभ घेऊ शकता. तर जाणून घेऊया कोणत्या स्मार्टफोनवर किती सूट उपलब्ध आहे.

Mi 11X 5G 

या स्मार्टफोनची किंमत 33,999 रुपये आहे. जी 29,999 रुपयांना विकली जात आहे. यासह, 2000 रुपयांची त्वरित सूट, 15,000 रुपयांपर्यंत एक्सचेंज बोनस आणि एसबीआय क्रेडिट कार्डद्वारे खरेदीवर नो कॉस्ट ईएमआय देखील दिले जात आहेत. याशिवाय 60 हजार रुपये किमतीचे टाइम्स प्राइमचे मोफत सदस्यत्वही दिले जात आहे.

Mi 11X Pro 5G 

48 हजार रुपयांचा हा फोन फक्त 39,999 रुपयांमध्ये उपलब्ध आहे आणि यासह, 3000 रुपयांची झटपट सवलत 15,000 रुपये एक्सचेंज बोनस, नो-कॉस्ट ईएमआय आणि 60,000 रुपयांचे टाइम्स प्राइमचे मोफत सदस्यत्व देखील दिले जात आहे.

Mi 10i

तुम्ही हा स्मार्टफोन फक्त 21,999 रुपयांमध्ये खरेदी करू शकता. यासह, तुम्हाला 1500 इन्स्टंट कॅशबॅक, नो कॉस्ट ईएमआय, एसबीआय क्रेडिट कार्डद्वारे केलेल्या खरेदीवर 13,000 रुपयांपर्यंत एक्सचेंज सूट मिळेल.

Redmi Note 10 Pro Max

या फोनची मूळ किंमत 22,999 रुपये आहे, जी फक्त 19,999 रुपयांना विकली जात आहे. यामध्ये एचडीएफसी बँक क्रेडिट कार्डद्वारे खरेदी केल्यास 1500 रुपयांची त्वरित सूट दिली जात आहे. यासह नो कॉस्ट ईएमआय आणि 11,000 रुपयांची एमआय एक्सचेंज ऑफर यामध्ये दिली जात आहे.

Redmi Note 10 Pro

हा फोन फक्त 17,999 रुपयांमध्ये उपलब्ध आहे आणि त्यावर 10,750 रुपयांची एक्सचेंज ऑफर दिली जात आहे. यासह, 10 हजार रुपयांचे जिओ लाभ देखील दिले जात आहे, जे 349 रुपयांच्या प्लॅनवर लागू आहे.

या स्मार्टफोन व्यतिरिक्त, आपण इतर अनेक शाओमी स्मार्टफोनवर एक्सचेंज ऑफर आणि सूटचा लाभ घेऊ शकता. तुम्हाला तुमच्या जुन्या फोनच्या मॉडेल आणि कंडिशननुसार एक्सचेंज ऑफरचा लाभ मिळेल. ज्यामध्ये फोन कोणत्या स्थितीत असेल त्यानुसार सवलत दिली जाईल.