फ्लिपकार्ट, अ‍ॅमेझॉनवर दिसणार 'Made In China' चे लेबल, चीनी प्रोडक्ट्सच्या सेलवर होणार परिणाम
प्रतिकामत्मक फोटो (Photo Credits-Facebook)

भारतात फ्लिपकार्ट  (Flipkart) आणि अ‍ॅमेझॉन( Amazon) सारख्या ई-कॉमर्स वेबसाईट्सवर लवकरच प्रोडक्ट्ससह त्यांच्या देशांच्या नावाचे लेबल लावल्याचे दाखवले जाणार आहे. यामुळे ग्राहकांना खरेदी करताना कोणत्या देशाचे प्रोडक्ट्स आपण खरेदी करत आहोत ते कळू शकणार आहे. शॉपिंग वेबसाईटवर मेड इन चायना (Made In China) असा सुद्धा लेबल लावण्यात येणार असल्याने त्याचा फटका चीनी प्रोडक्ट्सना बसणार आहे.

इकनॉमिक्स टाईम्स यांच्या रिपोर्टनुसार, डिपार्टमेंट फॉर प्रमोशन ऑफ इंडस्ट्री अ‍ॅन्ड इंटरनल ट्रेड (DPIIT) यांची एक बैठक पार पडली. या बैठकीत बहुतांश कंपन्यांनी त्यांच्या प्रोडक्ट्स लिस्टिंमध्ये बदलाव करण्यात यावा असे म्हटले आहे. परंतु प्रोडक्ट्स लिस्टिंमधील बदलाव कधी पर्यंत पहायला मिळणार हे अद्याप स्पष्ट नाही आहे. रिलायन्स जिओ यांनी रिलायन्स रिटेल, टाटा क्लिक आणि जिओ प्लॅटफॉर्म्सने एकमत दर्शवले आहे. (Flipkart Big Saving Days: फ्लिपकार्टवर आजपासून सुरु झालेल्या सेलमध्ये जबरदस्त फिचर्स असलेल्या 'या' स्मार्टफोन्सवर मिळतेय अफलातून ऑफर्स)

ई-कॉमर्स वेबसाईट त्यांच्या सेलर्स आणि रीटेलर्स सोबत यासंदर्भात बातचीत करुन सरकारला फिडबॅक देऊ शकतात. जर अशाच पद्धतीने लेबलिंग करण्यात आल्यास चीन मधील डिवाइसेस आणि प्रोडक्ट्सच्या सेलवर जरुर परिणाम होणार आहे. भारत आणि चीन मधील सीमावादामुळे चीनी प्रोडक्ट्सवर बहिष्कार टाकण्यात यावा अशी मागणी सोशल मीडियातून युजर्सने केल्याचे दिसून आले होते. भारत सरकारने सुद्धा चीनच्या विरोधात त्यांची भुमिका अधिक कठोर केली आहे. (Google Photos मध्ये बदल, युजर्सला मिळणार Redesigned Logo आणि मॅप)

लेबलिंगच्या मदतीने भारत सरकारच्या मेड इन इंडिया योजनेला सुद्धा प्रोत्साहन मिळू शकणार आहे. एका वरिष्ठ सरकारी अधिकाऱ्याने इकोनॉमिक्स टाईम्स यांना असे म्हटले आहे की, ऑफलाईन सेटिंग मध्ये ग्राहकांना प्रोडक्ट्स पाहण्यासह ते कोणत्या देशात बनवण्यात आले आहे ते सुद्धा कळणार आहे. त्यानंतर ग्राहक त्यांना कोणते प्रोडक्ट खरेदी करायचे आहे त्याबाबत निर्णय घेतील. अशाच पद्धतीचे ऑप्शन ई-कॉमर्स वेबसाईट्सवर सुद्धा दिला पाहिजे. याच्या मदतीने लोकल प्रोडक्ट्सचा सेल उत्तम होण्यास चालना मिळेल.