
सर्च इंजिन प्लॅटफॉर्म गुगलने त्यांच्या Google Photo साठीचा Logo आणि डिझाइनमध्ये बदल करण्याचे जाहीर केले आहे. गुगल ब्लॉक पोस्टच्या मते, गुगल फोटोचे नवे लेआउट (Layout) पुढील आठवड्यात अॅन्ड्रॉइड आणि आयओएस डिवाइससाठी रोलआउट करण्यात येणार आहे. अॅप नव्या UI सह तीन टॅब स्ट्रक्चर-फोटो, सर्च आणि लायब्ररीसह येणार आहे. यामध्ये नेहमीप्रमाणेच मेन टॅब असणार असून युजर्सला त्यांचे सर्व फोटो आणि व्हिडिओ मोठ्या Thumbnails मध्ये दिसणार आहेत. तसेच प्रत्येक फोटोंच्या मध्ये एक पांढऱ्या रंगाचा स्पेस सुद्धा दिसून येणार आहे. जर लायब्रेरी टॅब बाबत बोलायचे झाल्यास यामध्ये अल्बम, आर्काइव्ह आणि अन्य गोष्टींसाठी अॅक्सेस मिळणार आहे.(इंटरनेटशिवाय Google Map चा 'या' पद्धतीने करा वापर)
गुगल फोटोमध्ये नवा इंटरेक्टिव्ह मॅप व्यू सुद्धा देण्यात आला आहे. जो नव्या सर्च टॅबच्या येथे दिसून येणार आहे. तेथे युजर्सला पिंच किंवा झूम करत फोटो पाहण्यासह जगभरात ते एक्सपोर सुद्धा करता येणार आहेत. तसेच रोड ट्रिपच्या वेळी होम टाऊन किंवा अन्य ठिकाणचे फोटो सर्च करता येणार आहेत. मात्र जर युजर्सला यामध्ये बदल करायचा असल्यास लोकेशन हिस्ट्री आणि लोकेशन परमिशन बंद करता येणार आहे. गुगलने गेल्या वर्षात एक फिचर लॉन्च केले होते. त्यामध्ये युजर्सला त्यांचे जुने फोटो म्हणजेच Memories पाहता येणार आहेत. कंपनीने असे म्हटले आहे की, त्यांचे हे फिचर्स युजर्समध्ये सर्वाधिक प्रसिद्ध आहे. या फिचर्सच्या माध्यमातून तब्बल 120 मिलियन वेळा विजिट केली जाते. येथे प्रत्येक प्रकारची मेमोरी जसे बेस्ट पिक्चर, बेस्ट फ्रेंड आणि फॅमिली फोटो किंवा व्हिडिओ दिसून येणार आहेत.(Wifi किंवा मोबाईल डेटा Slow झालाय? इंटरनेट स्पीड वाढवण्यासाठी 'या' टीप्स जरुर वापरा)
दरम्यान, गुगलने नुकतेच युजर्सचा खासगी डेटा सुरक्षित ठेवण्यासाठी अॅप आणि ब्राउजिंगच्या सेटिंग्समध्ये बदल करण्याचे आवाहन केले होते. याच्या अंतर्गत गुगल ऑटो डिलिट कंट्रोल डिफॉल्ट रुप मध्ये सादर होणार आहे. जे प्रत्येक तीन महिन्यानंतर युजर्सचे लोकेशन, सर्च हिस्ट्री, वॉईस आणि युट्युब वरील सर्च करण्यात आलेल्या गोष्टी आपोआप डिलिट करण्यात येणार आहेत. म्हणजेच तीन महिन्यात युजर्सची गुगल हिस्ट्री अपडेट होणार आहे.