फिनटेक प्लॅटफॉर्म फोनपे (PhonePe) ने मंगळवारी पुण्यात (Pune) आपले नवीन कार्यालय सुरू करण्याची घोषणा केली. येथे सुमारे 400 कर्मचारी एकत्र काम करतील. या आठवड्यापासून हे कार्यालय पूर्णपणे कार्यान्वित होईल. 50,000 चौरस फूट क्षेत्रफळात पसरलेल्या या नवीन कार्यालयात खूप मोकळेपणा असेल, ज्यामुळे कर्मचाऱ्यांमध्ये प्रभावी सहयोग निर्माण होण्यास मदत होईल, असे कंपनीने एका निवेदनात म्हटले आहे.
नवीन कार्यालयात 3,000-स्क्वेअर फूट कॅफेटेरिया आहे, जो कंपनीच्या कर्मचार्यांना स्थानिक आणि बहु-पाककृती जेवण देईल. कंपनीने म्हटले आहे की लिंग विविधता आणि समावेशाच्या आपल्या मिशनच्या अनुषंगाने, नवीन कार्यालय सुरक्षित आणि मैत्रीपूर्ण कार्यस्थळाचा प्रचार करेल. 400 दशलक्ष नोंदणीकृत वापरकर्त्यांसह, आता चारपैकी एक भारतीय फोनपे वापरत आहेत. कंपनीने देशातील 99 टक्के पिन कोडसह, टियर 2, 3, 4 शहरे आणि त्यापुढील 32 दशलक्ष ऑफलाइन व्यापाऱ्यांचे यशस्वीरित्या डिजिटलीकरण केले आहे.
फोनपेने 2017 मध्ये आर्थिक सेवांमध्ये प्रवेश करून, वापरकर्त्यांना 24-कॅरेट सोने आणि अलीकडेच त्यांच्या प्लॅटफॉर्मवर लाँच केलेली चांदी खरेदी करण्यासाठी सुरक्षित आणि सोयीस्कर पर्याय उपलब्ध करून दिला. फोनपेद्वारे वापरकर्ते पैसे पाठवू आणि प्राप्त करू शकतात, मोबाइल रिचार्ज करू शकतात, डीटीएच (DTH) रिचार्ज करू शकतात, स्टोअरमध्ये ऑनलाईन पेमेंट करू शकतात, म्हणजेच त्यांची जवळजवळ सर्व उपयुक्त पेमेंट करू शकतात. (हेही वाचा: वेदांता-फॉक्सकॉननंतर महाराष्ट्राला अजून एक धक्का; PhonePe ने घेतला राज्यातून बाहेर पडण्याचा निर्णय, जाणून घ्या कुठे असेल नवे कार्यालय)
फोनपेला अलीकडेच ट्रस्ट रिसर्च अॅडव्हायझरी (TRA) ने ब्रँड ट्रस्ट रिपोर्ट 2022 नुसार डिजिटल पेमेंटसाठी सर्वात विश्वासार्ह ब्रँड म्हणून मान्यता दिली आहे. दरम्यान, याआधी फोनच्या एका वृत्तपत्रातील जाहीर सूचनेनुसार, त्यांनी मुंबईतील कंपनीचे कार्यालय कर्नाटकात स्थलांतरित करण्यात येणार असल्याचे सूचित केले होते. फोनपेने आपले मुंबई कार्यालय बेंगळुरू हलवण्याचा निर्णय घेतला होता. आता कंपनी पुण्यात त्यांचे नवीन कार्यालय सुरु करत आहे.