Facebook वर नवं ऑप्शन, एका क्लिकवर डिलिट होईल शेअर केलेला डेटा
फेसबुक (Photo Credits: ANI)

सोशल मीडिया साईट फेसबुकवर एक नवं ऑप्शन आले आहे. त्यानुसार या ऑप्शनमध्ये तुम्हाला थर्ड पार्टी अॅप आणि वेबसाईट्सह शेअर केलेला डेटा डिलिट करता येणार आहे. इंटरनेटचा वापर करताना तुम्ही फेसबुकवर पोस्ट केलेल्या गोष्टीसोबत विविध वेबसाईट्सोबत हा डेटा शेअर केला जातो. एवढेच नाही तर काही वेबसाईट्स आणि अॅपमध्ये फेसबुकच्या सहाय्याने लॉग-इन करण्याचा ऑप्शन उपलब्ध होतो. असे केल्यास फेसबुक अकाउंट संबंधित जोडलेले काही डेटा ही या साईट्स आणि अॅपवर शेअर केला जातो.

जगात जाहीरातींसाठी सर्वात मोठं प्लॅटफॉर्म असलेल्या फेसबुकला त्यांच्या युजर्सबाबत अधिक माहिती करुन घ्यायचे आहे. अशातच वेबसाईट्स किंवा अॅपकडे तुमच्या पसंतीच्या डेटा असून तो तुम्हाला तुमच्या आवडीच्या जाहिराती दाखवण्यास मदत करतो. युजर्सला आकर्षित करण्यासाठी सोशल प्रोफाईल संबंधित जोडल्या गेलेल्या डेटाचा उपयोग केला जातो. युजर्सच्या पसंतीनुसार त्यांना जाहिराती फेसबुकवर झळकवल्या जातात. (सावधान! Tinder सह अन्य डेटिंग अ‍ॅप लीक करत आहेत तुमची खासगी माहिती)

फेसबुक डेटाची ही माहिती अद्याप गुप्त ठेवण्यात आली होती. नुकत्याच डेटा लीक होण्याच्या प्रकारांमुळे युजर्सची प्राव्हसी कायम ठेवणे हा प्रश्न उपस्थित केला जात आहे. त्यामुळे युजर्सला प्रायव्हसी सतत पाहण्यासाठी ऑप्शन दिले आहे. त्यामध्ये 'ऑफ फेसबुक अॅक्टिव्हिटी' असे नव ऑप्शन रोलआऊट करण्यात आले आहे. युजर्सने जर आता पर्यंत त्यांचा डेटा अन्य अॅप किंवा वेबसाईट्सवर शेअर केला असेल त्यांनी प्रायव्हसी सेटिंग मध्ये जाऊन क्लिअर केला जाऊ शकतो.