सावधान! Tinder सह अन्य डेटिंग अ‍ॅप लीक करत आहेत तुमची खासगी माहिती
Tinder App (Photo Credits-Twitter)

सध्या बदलत्या काळानुसार ऑनलाईन पद्धतीच्या मदतीने एकमेकांना डेट केले जाते. त्यासाठी विविध अॅप उपलब्ध झाले असून त्याच्या माध्यमातून मैत्रीच्या नात्याची सुरुवात होते. टिंडर, ग्रिंडर, OKक्युपिड सारखे डेटिंग अ‍ॅप तरुणाईमध्ये ट्रेन्डिंग आहेत. मात्र जर तुम्ही डेटिंग अॅप वापरत असाल तर सावध व्हा. कारण डेटिंग अ‍ॅपच्या माध्यमातून सध्या तुमची खासगी माहिती लीक करण्यात येत असल्याची धक्कादायक गोष्ट समोर आली आहे. एका रिपोर्टनुसार, डेटिंग अ‍ॅप युजर्सचा डेटा लीक करुन दुसऱ्या कंपनीसोबत शेअर करणे हे नियमबाह्य आहे.

नार्वे कंज्युमर काउंसिल सरकारच्या मदतीने चालणाऱ्या नॉनप्रॉफिट ग्रुपने असे सांगितले आहे की, ऑनलाईन पद्धतीने जाहीरात करणाऱ्या कंपन्या स्मार्टफोन युजर्सच्या प्रोफाईलला ट्रॅक करतात. नार्वेच्या या काउंसिलने एका सायबक सिक्युरिटी कंपनी Mnemonic सोबत मिळून 10 अ‍ॅन्ड्रॉइड अ‍ॅपबाबत अभ्यास केला आहे. या दरम्यान असे समोर आले की, हे डेटिंग अॅप 135 विविध थर्ट पार्टी जाहिरातदार कंपन्यांना युजर्सचा डेटा शेअर करत आहेत. (Instagram युजर्ससाठी TikTok सारखे फिचर्स रोलआऊट)

 युजर्सचा डेटा लीक करण्याची स्थिती हाताबाहेर आहे. त्यामुळेच या डेटा लीकच्या प्रकरणावर चाप बसवण्यासाठी जीडीपीआर नियम लागू करण्यास सांगितला आहे. रिपोर्ट मध्ये असे ही सांगितले की, Period tracker अॅप आणि Virtual makeup app Perfect 365 सारखे अॅप ही युजर्सचा पर्सनल डेटा लीक करत आहेत.