तुमच्या शिवाय Facebook सुद्धा ऐकू शकणार नाही तुमचे मॅजेंसर कॉल्स, App साठी येणार नवे सिक्युरिटी अपडेट
फेसबुक (Photo Credits: ANI)

फेसबुक मॅसेंजर आपल्या वॉइस आणि व्हिडिओ कॉलसाठी एंड-टू-एंड एन्क्रिप्शन किंवा E2EE जोडणार आहे. कंपनीने मेसेज गायब करण्यासाठी कंट्रोल सुद्धा अपडेट केले आहे. सोशल मीडिय दिग्गजने एका ब्लॉक पोस्ट मध्ये नव्या अपडेटची घोषणा केली आहे. त्यात असे म्हटले की, लोक अपेक्षा करतात की त्यांचे मेसेजिंग अॅफ सुरक्षित आणि प्रायव्हेट असावेत. तसेच नव्या सुविधेसह आम्ही त्यांना या गोष्टीवर अधिक कंट्रोलदेत आहोत की, ते आपले कॉल आणि चॅट हे किती खासगी ठेवू शकतात. गेल्या एका वर्षात आम्ही मॅसेंजरवर एका दिवसात 150 मिलियनहून अधिक व्हिडिओकॉलसह ऑडिओ आणि व्हिडिओ कॉलिंगच्या वापरात वाढ झाल्याचे पाहिले आहे. आता आम्ही या चॅट मोडवर कॉलिंगची सुरुवात करणार आहोत. त्यामुळे तुम्ही तुमचे ऑडिओ आणि व्हिडिओ कॉल त्याच तंत्रज्ञानाच्या मदतीने सुरक्षित ठेवू शकता. मात्र तसा तुम्हाला पर्याय निवडावा लागेल असे मॅसेंजरचे उत्पाद प्रबंधनचे निर्देशक रुथ क्रिकेली यांनी शुक्रवारी एका ब्लॉग पोस्ट मध्ये म्हटले आहे.

आतापर्यंत फक्त एकावर एक टेक्स चॅट एं-टू-एंड एन्क्रिप्टेड होती. मात्र तेच आता कॉलसाठी उपलब्ध आहे. याचा अर्थ असा की, फेसबुकसह कोणीही अन्य ते पाहू किंवा ऐकू शकत नाही जे तुम्ही पाठवले किंवा ऐकवले आहे. कंपनीने असे म्हटले, व्यक्तीगत बातचीत हॅकर्स आणि गुन्हेगारांना सुरक्षित ठेवण्यासठी WhatsApp सारखे अॅप आधीपासूनच एंड-टू-एंड एन्क्रिप्शनच्या व्यापक रुपात वापर करत आहे. फेसबुकचे असे म्हणणे आहे की, E2EE इंडस्ट्री स्टँडर्ड तयार करत असून एका किल्ली आणि टाळ्यासारखे काम करत आहे. जेथे फक्त तुम्ही आणि चॅट किंवा कॉल मधील लोकच बातचीत पर्यंत पोहचू शकतात.(Xiaomi कडून 100W वायरलेस चार्जिंग स्टँड लॉन्च, अवघ्या काही मिनिटांत चार्ज होणार फोन)

E2EE व्यतिरिक्त फेसबुक मॅसेंजरने एक्सपायरिंग मेसेज फिचर सुद्धा अपडेट केले आहे. सोशल मीडियातील दिग्गज कंपनीने असे म्हटले आहे की, सर्व युजर्स नेहमीच आपले मेसेज सांभाळून ठेवण्यास प्रयत्न करततात. यासाठी नवा टायमर कंट्रोल एखाद्याला हे ठरवण्याची वेळ देते की, त्याला चॅटमधील त्यांचे मेसेज कधी एक्सपायर होऊ शकतात.