DTH आणि केबल टीवी धारकांसाठी तात्पुरता दिलासा, नवे नियम 1 मार्च पासून लागू नाही
TV Channels | (Photo Credits: File)

टेलिकॉम रेग्युलिटरी अथॉरिटी ऑफ इंडिया (TRAI)च्या National Order 2.0 लागू करण्यासाठी अजून वेळ लागण्याची शक्यता आहे. खरंतर बॉम्बे हायकोर्टाने IBF विरुद्ध TRAI ची सुनावणी 26 फेब्रुवारी पर्यंत टाळली आहे. 1 जानेवारीला ट्रायकडून टॅरिफ प्लॅनमध्ये बदल करण्यात आले होते. त्यामुळे ब्रॉडकार्स्टर्स यांनी नाराजी व्यक्त केली होती. इंडियन ब्रॉडकास्टिंग फाउंडेशनने (आयबीएफ) प्रसारणकर्त्यांसाठी या समस्येपासून मुक्त होण्यासाठी मुंबई उच्च न्यायालयात धाव घेतली होती.या प्रकरणाची सुनावणी गेल्या 4 आठवड्यांपासून थांबली आहे. 30 जानेवारीला कोर्टाने या प्रकरणाची सुनावणी 12 फेब्रुवारी पर्यंत टाळली होती. त्यानंतर आता सुनावणी 26 फेब्रुवारी पर्यंत पुढे ढकलली आहे. यामुळेच असे स्पष्ट होते की, DTH आणि केबल धारकांना नवे प्लॅन 1 मार्च पासून लागू करण्यात येणार नाही आहेत.

आयबीएफ बाबत बोलायचे झाल्यास हे एक लोकप्रिय ब्रॉडकास्टर्सचे प्रतिनिधित्व करतात. अशातच आयबीएफ ब्रॉडकास्टर्सना ट्रायच्या नव्या नियमांपासून दिलासा देण्याचा प्रयत्न करत आहे. नव्या चॅनलच्या पॅकमध्ये चॅनलसाठी 12 रुपयांपेक्षा अधिक किंमत नसणार आहे. सध्या ब्रॉडकास्टर्स a-la-carte चॅनल्ससाठी 19 रुपये किंमतीत उपलब्ध करुन देतात.(TRAI देणार आता Set Top Box ऐवजी DTH बदलण्याची सुविधा)

 DTH आणि केबल टीव्ही सब्सक्रायबर्संना आता केवळ 130 रुपयांत 200 चॅनेल्स पाहता येऊ शकणार आहेत. टेलिकॉम टॉकच्या रिपोर्टनुसार, (TRAI)नॅशनल टेरिफ ऑर्डर 2.0 मध्ये मल्टी टीव्ही युजर्ससाठी एनसीएफ सह 130 रुपयात फ्री टू एअर चॅनेल दाखवण्याची सूचना केली आहे. या डिस्काउंटमुळे ग्राहक प्रचंड खूश आहेत. तर ब्रॉडकास्टर्स आणि ऑपरेटर्सकडून डिस्काउंट दिला आहे. या डिस्काउंटचा ग्राहकांना प्रचंड फायदा होणार आहे. नव्या टेरिफ ऑर्डरच्या युजर्सच्या संख्येत आता डीटीएच आणि केबल टीव्ही सर्विसशी जोडणार आहे.