
देशभरात परसलेल्या कोरोना व्हायरसमुळे नागरिक त्रस्त झाल्याने लॉकडाउनची परिस्थिती ओढावली आहे. तसेच नागरिकांना कोरोना पासून बचाव करण्यासाठी घरी थांबण्यास सांगितेल आहे. मात्र अत्यावश्यक सेवासुविधा नागरिकांसाठी सुरु ठेवण्यात आल्या आहेत. परंतु अन्य गोष्टी पूर्णपणे बंद ठेवण्यात याव्यात असे आदेश सरकारकडून देण्यात आले आहेत. याच पार्श्वभुमीवर ई-कॉमर्स वेबसाईट फ्लिपकार्ट (Flipkart) यांनी त्यांच्या सर्व सर्विस बंद केल्याची माहिती ग्राहकांना दिली आहे. त्याचसोबत सर्विस बंद केल्यानंतर फ्लिपकार्टच्या वेबसाईटवर त्यांनी कोरोना व्हायरस संबंधित जनजागृती करण्यासाठी एक महत्वाचा संदेश सुद्धा दिला आहे.
जर तुम्ही फ्लिपकार्टची वेबसाईट सुरु केल्यास तेथे तुम्हाला प्रथम कोरोना व्हायरस संबंधित काही माहिती देण्यात आली आहे. त्यानुसार फ्लिपकार्टने असे म्हटले आहे की, तुमची गरज हे आमच्यासाठी फार महत्वाचे आहे. मात्र आम्ही लवकरच आमची सर्विस पुन्हा लवकरच सुरु करु असे ही फ्लिपकार्ट यांनी म्हटले आहे. पण कोरोनाची स्थिती पाहता तुम्ही घरीच स्वस्थ रहा असे आवाहन सुद्धा करण्यात आले आहे.(Coronavirus: कोरोना व्हायरसवर मात करण्यासाठी Facebook ने घेतला 'हा' महत्वाचा निर्णय)

दरम्यान, पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी मंगळवारी रात्री जनतेशी पुन्हा संवाद साधला आहे. त्यावेळी मोदी यांनी असे म्हटले आहे की, देभरात येत्या 14 एप्रिल पर्यंत लॉकडाउन कायम राहणार आहे. परंतु लॉकडाउनच्या परिस्थितीत नागरिकांना अत्यावश्यक सेवासुविधा पुरवल्या जाणार आहेत. त्यानंतर भारतीय रेल्वेने सुद्धा 14 एप्रिल पर्यंत त्यांची सेवा बंद ठेवण्याचा निर्णय घेतला आहे.