$Gari Token (Photo Credits-Twitter)

स्वदेशी शॉर्ट व्हिडिओ अॅप Chingari नुकत्याच आपल्या प्लॅटफॉर्मवर $Gari, एक स्वदेशी क्रिप्टोक्युरेंसी टोकन शनिवारी भारतात लॉन्च केले आहे. चिंगारी द्वारे लॉन्च करण्यात आलेल्या क्रिप्टो टोकन, आपले स्वत: NFT मार्केटप्लेस सुद्धा लॉन्च करणार आहे. $Gari च्या ब्रँन्ड अॅम्बेसेडरच्या रुपात बॉलिवूड अभिनेता सलमान खान असणार आहे. क्रिप्टो टोकन हे सोलाना ब्लॉकचॅनच्या सहाय्याने विकसित केले आहे. $Gari ची आर्थिक टोकन ऐवजी एक सोशल टोकनच्या रुपात जाहीरात करण्यात येणार आहे. त्यामुळे क्रिएटर्सला आपल्या कंटेटच्या आधारावर कॉइन जमा करता येणार आहेत.

नवे क्रिप्टो टोकन चिंगारी द्वारे लॉन्च केले होते. जो भारतात बंदी घातलेल्या चीनी अॅप टिकटॉकला टक्कर देण्यासाठी लॉन्च केले गेलेले स्वदेशी शॉर्ट व्हिडिओ अॅप आहे. चिंगारीचे CEO आणि सह-संस्थापक सुमित घोष यांनी असे म्हटले की, प्लॅटफॉर्मवर युजर्सला कंटेट तयार करणे किंवा पाहण्यासाटी क्रिप्टो टोकन मिळवण्याची परवानगी देणार आहे.(Know Your Postman अॅप लॉन्च; तुमच्या परिसरातील पोस्टमनला करता येईल Locate)

Tweet:

$Gari चा ब्रँन्ड अॅम्बेसेडर असलेल्या सलमान खान याने म्हटले की,  निर्मात्यांकडून मनोरंजनाच्या भविष्याला आकार दिला जात आहे. $ GARI बक्षीस कार्यक्रमाच्या समावेशामुळे, निर्मात्यांना चिंगारी अॅपवर नवीन आणि अधिक आकर्षक व्हिडिओ तयार करण्याची प्रेरणा मिळेल.

Tweet:

चिंगारीने घोषणा केली की, त्यांनी नुकत्याच एका फंडिगचा एक हिस्सा पूर्ण केला आहे. त्यानुसार 30 हून अधिक वेंचर फंड आणि इंडिविज्युअल इन्वेस्टरकडून $19 मिलियनहून अधिक एकत्रित करण्यात आले आहेत. कंपनीनुसार, फंडिगच्या या काळात सोलाना ब्लॉकचेनसह $Gari ला अधिक विकसित करण्यास मदत होणार आहे. चिंगारी यांचे असे म्हणणे आहे की, ते या फंडचा वापर त्यांच्या प्लॅटफॉर्मवरील कंटेट बनवणाऱ्या कंटेटस्टर्सला कमाई करण्यास मदत होईल. भारतातील शॉर्ट व्हिडिओ अॅप नोव्हेंबर 2018 मध्ये बंगळुरु येथे स्थापित करण्यात आला होता. अॅप Intagram Reels, MX Takatal, Josh आणि Moj सारखे प्लॅटफॉर्मला टक्कर देतात.