Child Porn पाहण्यासंबंधित इमेलच्या माध्यमातून धमकी देत युजर्सकडून पैशांची लूट
प्रातिनिधिक प्रतिमा (Photo Credits: File Image)

सध्या इमेल(Email) युजर्सच्या मेलबॉक्स मध्ये एक मेसेज पाठवण्यात येत असून त्यामध्ये चाईल्ड पॉर्न  (Child Porn) पाहण्यासंबंधित धमकी दिली जात आहे. तसेच या धमकीच्या माध्यमातून युजर्सकडून पैशांची लूट करण्यात येत आहे. तर स्कॅम (Scam) करणाऱ्या व्यक्तीकडे चाइल्ड पॉर्नोग्राफी संबंधित सर्व रेकॉर्डिंगसह कोणत्या व्यक्तीने ती पाहली आहे याची माहिती असल्याचा दावा केला जातो.. तसेच युजर्सला इमेलच्या माध्यमातून भरण्यासाठी सांगण्यात आलेली रक्कम बिटकॉईनच्या माध्यमातून द्यायची आहे अशी अट घालण्यात आलेली आहे. असे न केल्यास युजर्सचे व्हिडिओ सर्वत्र लीक करण्यात येतील असे ही म्हटले आहे. त्यामुळे व्हिडिओ लीक होऊ नये म्हणून युजर्सला 5000 यूरो (जवळजवळ 4 लाख रुपये) ची मागणी करण्यात आली आहे.

इमेल सेक्सटॉर्शन म्हणजे काय?

उघडकीस आलेला प्रकार क्लासिक इमेल सेक्सटॉर्शनचा असल्याचे सांगण्यात येत आहे. यामध्ये स्कॅमर युजर्सला असे भासवून देतो की जो अडल्ड व्हिडिओ त्याने पाहिला आहे त्याची संपूर्ण माहिती त्याच्याकडे आहे. त्यामुळे युजर्सला या संबंधित माहिती लीक होऊ नये म्हणून मोठी रक्कम भरावी लागणार असल्याची धमकी देण्यात येते. काही प्रकरणी युजर्सला इमेल आयडी, पासवर्ड किंवा अन्य गोष्टींबाबत सुद्धा माहिती उपलब्ध असते. त्यामुळे काही युजर्स घाबरुन या फसवणूकीला बळी पडून पैसे देण्यास तयार होतात.(फेसबुकला माहिती आहे तुम्ही SEX कधी केला होता! काही अॅप लीक करतायत तुमची माहिती)

काय काळजी घ्यावी?

युजर्सची फसवणूक करणारे मेसेज सध्या प्रचंड वेगाने वाढत आहेत. त्यामुळे अशा प्रकारच्या मेसेजवर विश्वास ठेवणे टाळा. त्याचसोबत इमेल्य तुम्ही Spam मार्कसुद्धा करु शकता. काही वेळेस युजर्सला इमेलसह व्हिडिओ फाइल पाठवली जाते. परंतु ती व्हिडिओ फाइल कधीच सुरु किंवा डाऊनलोड करु नये. कारण या फाइल्समध्ये वायरस असून तो तुमच्या कम्युटर किंवा कॅमेऱ्याला हॅक करु शकतो.