सोशल मीडियाच्या माध्यमातून यूजर्सचा डाटा लीक होण्याचा आरोप यापूर्वी अनेक वेळा झाला आहे. यात आता आणखी एका नव्या प्रकरणाची भर पडली आहे. एका प्रसीद्ध सोशल मीडिया अॅपच्या माध्यमातून फेसबुक (Facebook) यूजर्सचा आरोग्यासंबंधीचा डाटा लिक करत असल्याचा प्रकार पुढे येत आहे. हा प्रकार इतका धक्कादायक आहे की, तुम्ही आपल्या जोडीदारासोबत शरीरसंबंध (Sex) कधी ठेवले होते याची माहिती ठेवता का किंवा ही बाब तुमच्या ध्यानात राहते का? तसेच, तुमच्या शरीरसंबंधांबाबत किती लोकांना माहिती असते? शक्यतो नसतेच ना? पण, धक्कादायक असे की, तुमच्या या सर्व गोष्टींची माहिती फेसबुकला समजू शकते.
इंग्लंड स्थित प्रायव्हसी वॉचडॉग Privacy International ने नुकताच आपला एक अहवाल प्रसिद्ध केला. यात दावा करण्यात आला आहे की, महिलांची मासिक पाळी आणि गर्भधारणा कालावधी यांची माहिती ठेवणारी अॅप जसे की, Maya आणि Mia Fem. ही अॅप आपल्या यूजर्सची खासगी माहिती (डाटा) फेसबुकसोबत शेअर करत आहेत. विशेष म्हणजे हा डेटा यूजर्सकडून स्वत: अॅपमध्ये संग्रहित केला जातो. ज्यात आपण शेवटी शारीरिक संबंध कधी ठेवले, कोणते गर्भनिरोधक वापरले, साधारण मासिक पाळी केव्हा आली-चुकली यांसारख्या गोष्टींची नोंद या अॅपमध्ये ठेवलेली असते.
दरम्यान, प्रायव्हसी वॉचडॉग अहवालानुसार ही माहिती ‘फेसबुक सॉफ्टवेयर डेव्हलपमेंट किट’ (Facebook Software Development Kit) द्वारे लीक होत आहे. हे फेसबुक सॉफ्टवेअर डेव्हलपमेंट कीट खास ऑपरेटींग सिस्टमसाठी अॅप डेव्हलप करणे, ट्रॅक अॅनेलिटीक्स आणि अॅप मॉनेटाइज करण्यासाठी मदत करते. प्रायव्हसी इंटरनॅशनल अहवालानुसार Maya आणि Mia Fem ही अॅप जशी यूजर्सकडून डाऊनलोड केली जाताच आपले काम सुरु करतात. ही अॅप आपला डेटा फेसबुकसोबत शेअर करतात. (हेहीक वाचा, Facebook ला जबर फटका, डेटा लीक प्रकरणी भरावा लागणार 5 अब्ज डॉलर्सचा भुर्दंड)
यूजर्सकडून प्राप्त झालेला डेटा विविध कंपन्या, विमा कंपन्या, आणि जाहिरातदारांकडून चुकीच्या पद्धतीने वापरला जाऊ शकतो. या डेटाच्या माध्यमातून काही यंत्रणा यूजरसोबत पक्षपात (दुजाभाव) करु शकतात. दरम्यान, BuzzFeed ने आपल्या अहवालात दावा केला आहे की, डेटा लिकच्या आरोपाचे फेसबुक प्रवक्ता जो असबर्न यांनी खंडण केले आहे.