laptop (Pic Credit - Twitter)

टेक्नॉलॉजी कंपनी असुसने सीईएस 2022 (CES) इवेंटमध्ये जगातील पहिलाच फोल्डेबल लॅपटॉप जेनबुक 17 फोल्ड (Zenbook 17 Fold) लॉन्च केला आहे. या लॅपटॉपमध्ये 17 इंचाचा ओएलईडी डिस्प्ले दिला गेला आहे. जो फोल्ड झाल्यानंतर 12.5 इंचाचा होणार आहे. याचे स्क्रिन रेजॉल्यूश 2.5के आहे. तर या लॅपटॉपमध्ये इंटेल आणि बीओई टेक्नॉलॉजी ग्रुपसह मिळून तयार करण्यात आला आहे.

असुसच्या मते, जेनबुक 17 फोल्डमध्ये फुल साइज अरगोसेंस ब्लूटूथ की-बोर्ड आणि एक टचपॅड दिला गेला आहे. युजर्सला या लॅपटॉपचा वापर टॅबलेटच्या रुपात सुद्धा करता येणार आहे. आतापर्यंत या फोल्डबेल लॅपटॉपच्या किंमतीबद्दल अधिक माहिती समोर आलेली नाही. परंतु असा अंदाज लावला जात आहे की, लॅपटॉपची विक्री या वर्षातच केली जाईल.(OnePlus 10 Pro स्मार्टफोन जानेवारी महिन्यात होणार लॉन्च, जाणून घ्या अधिक)

असुस जेनबुक 17 फोल्ड 17.3 इंचाचा ओएलईडी डिस्प्लेसह येणार आहे. याचे रेजॉल्यूशन 2560X1920 पिक्सल आहे. याची स्क्रिन 70 टक्के कमी हानीकारक ब्लू लाइट प्रोड्यूस करते. या लॅपटॉपमध्ये पॉवरसाठी ग्राफिक कार्डसह इंटेल कोर आय7 प्रोसेसर दिला गेला आहे. हा लॅपटॉप विडोंज11 ऑपरेटिंग सिस्टिमवर काम करतो.

असुस जेनबुक 17 लॅपटॉपमध्ये 16 जीबी रॅम आणि 1 टीबी एसएसडी स्टोरेज दिला गेला आहे. या लॅपटॉपमध्ये 5 मेगापिक्सलचा कॅमेरा दिला गेला आहे. जो आयआर फंक्शनसह येणार आहे. याचा कॅमेरा विंडोज हॅलोला सपोर्ट करणार आहे.लॅपटॉपमध्ये 75 वॅटची बॅटरी दिली गेली आहे. याची बॅटरी 65 वॅट फास्ट चार्जिंग सपोर्ट करणार आहे. या व्यतिरिक्त लॅपटॉपमध्ये कार्ड रीडर आणि युएसबी पोर्ट सारखे कनेक्टिव्हिटी फिचर्स मिळणार आहेत.