OnePlus 10 Pro स्मार्टफोन जानेवारी महिन्यात होणार लॉन्च, जाणून घ्या अधिक
OnePlus- प्रातिनिधिक प्रतिमा (Photo Credits-Twitter)

OnePlus 10 Pro स्मार्टफोन कंपनीचा फ्लॅगशिप स्मार्टफोन आहे. हा फोन चीनमध्ये 11 जानेवारी 2022 ला लॉन्च होईल. कंपनीने OnePlus 10 Pro स्मार्टफोनचे प्रमोशन सुरू केले आहे. पण OnePlus 10 Pro स्मार्टफोन चीनमध्ये केव्हा लॉन्च केला जाईल, त्याची अधिकृत लॉन्च तारीख याक्षणी घोषित केलेली नाही.(Xiaomi 11i HyperCharge 5G भारतात लॉन्च, अवघ्या 15 मिनिटात स्मार्टफोन फुल्ल चार्ज होणार असल्याचा कंपनीचा दावा)

OnePlus 10 Pro स्मार्टफोनमध्ये ट्रिपल रियर कॅमेरा सेटअप उपलब्ध असेल. त्याचा मुख्य कॅमेरा 48-मेगापिक्सलचा असेल. याशिवाय 50-मेगापिक्सल कॅमेरा आणि 8-मेगापिक्सल कॅमेरा उपलब्ध असेल. त्याचा दुय्यम कॅमेरा अल्ट्रा-वाइड टेलीफोटो सेन्सर सपोर्टसह येईल. OnePlus च्या आगामी स्मार्टफोन OnePlus 10 Pro मध्ये सेकंड जनरेशन Hasselblad Pro मोड कॅमेरा दिला जाईल. त्याचा सपोर्ट फोनच्या प्रत्येक कॅमेऱ्यात उपलब्ध असेल. याच्या मदतीने तुम्ही 10-बिट रंगाचे फोटो क्लिक करू शकाल. OnePlus 10 Pro च्या अल्ट्रा-वाइड कॅमेराचे दृश्य क्षेत्र 150 अंश असेल.  Realme GT 2 Pro स्मार्टफोन देखील 150 डिग्री फील्ड ऑफ व्ह्यूसह लॉन्च करण्यात आला आहे. यामध्ये विस्तीर्ण इमेज क्लिक करता येते. जरी ते फिश आय सपोर्टसारखे नसेल.

OnePlus 10 Pro स्मार्टफोन Snapdragon 8 Gen 1 चिपसेट सपोर्टसह येईल.हा फोन Android 12 आधारित Oxygen OS 12 वर काम करेल. फोन Fluid AMOLED डिस्प्ले सपोर्टसह येईल. तसेच दुसरी पिढी LTPO तंत्रज्ञानावर काम करेल. फोन 120Hz रिफ्रेश रेट सपोर्टसह येईल. हा फोन 12GB LPDDR5 रॅम आणि 256GB UFS3.1 सह येईल. फोनमध्ये ट्रिपल रिअर कॅमेरा उपलब्ध असेल, जो ड्युअल OIS सपोर्टसह येईल. फोनच्या फ्रंटमध्ये 32 मेगापिक्सल कॅमेरा सपोर्ट दिला जाईल. OnePlus 10 Pro ला 5000mAh बॅटरीसह 80W सुपर VOOC फास्ट चार्जिंग मिळेल. तसेच 50W AirVOOC वायरलेस चार्जिंग सपोर्ट दिला जाऊ शकतो.फोनमध्ये ड्युअल स्टीरिओ स्पीकर आणि ब्लूटूथ 5.2 सपोर्ट देण्यात आला आहे. फोनचे डायमेंशन 163x73.9x8.5mm असेल.